|Saturday, October 20, 2018
You are here: Home » मनोरंजन » अक्षयच्या ‘पॅडमॅन’ मध्येही झळकणार बीगबी

अक्षयच्या ‘पॅडमॅन’ मध्येही झळकणार बीगबी 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

अभिनेता अमिताभ बच्चन सध्या दिल्लीमध्ये आर बल्की यांच्या ‘पॅडमॅन’ सिनेमाच्या चित्रणीकरणामध्ये व्यग्र आहेत. अक्षय कुमारची मुख्य भूमिका अशलेल्या या सिनेमात शहेनशहा एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. पण त्यांची व्यक्तीरेखा नेमकी काय आहे हे मात्र अजून गुलदसत्यात आहे.

बाल्की आणि अमिताभ यांनीही याआधीही ‘चीनी कम, पा, शमिताभ या सिनेमांत एकत्र काम केले आहे. तसेच बालकीच्या इतर सिनेमांत बिग बींनी पाहुण्या कलाकाराची भूमिकाही साकारली आहे. बाल्कींचा कोणताही सिनेमा असो त्यात बच्चन यांची झलक तर पहायला मिळतेच. त्यामुळेच अमिताभ हे बाल्कींचे ‘लकी चार्म’ आहेत. असेच म्हणावे लागेल. करण जोहरचीही कधी एकेकाळी काजोल ‘लकी चार्म’होती असे म्हणावे लागेल. कारण करणच्या प्रत्येक सिनेमात ती हमखास दिसायची. अरूणाचलम् मुरूगानंदम यांच्या आयुष्यावर ‘पॅडमॅन’ हा सिनेमा बेतलेला आहे. मासिक पाळीकडे आपल्याकडे आजही गुप्तेचा विषय म्हणून बघितले जाते. एवढच कायतर काही वर्षांपूर्वी मासिक पाळीत घ्यावी लागणारी स्वच्छता हीदेखील दुर्लक्षिलेलीच गोष्ट होती पण, अरूणाचलम् यांच्या ते लक्षात आले आणि त्यांनी स्त्रियांसाठी विशेषतः खेडय़ातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार केले. यातून त्यांनी अनेक त्र्यांना रोजगारही मिळवून दिला, यावरच ‘पॅडमॅन’चित्रपट आधारित आहे. ‘पॅडमॅन’ची म्हणजेच अरूणाचलम् मुरूगानंदम् यांची मुख्य भूमिका अक्षय साकारत आहे.

Related posts: