|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » मनोरंजन » चला हवा येऊ द्यामध्ये मस्त मस्त गर्ल रविना टंडन

चला हवा येऊ द्यामध्ये मस्त मस्त गर्ल रविना टंडन 

आपल्या अभिनयाने आणि नफत्याच्या अदाकारीने चित्रपट रसिकांची मने जिंकणारी बॉलिवूडची मस्त गर्ल अशी ओळख असणारी रविना टंडन आता हिंदी चित्रपटात कम बॅक करत आहे. तिचा ‘मातफ’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविनाने हजेरी लावली ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर. 18 एप्रिलला रात्री 9.30 वाजता हा भाग प्रसारित होणार आहे. तर सोमवारच्या भागात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ मालिकेतील कलाकार सहभागी होणार आहेत.

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आजवर अनेक सुप्रसिद्ध बॉलिवूड मंडळींनी हजेरी लावली आणि याच मंचावर आता मस्त मस्त गर्ल रविनासुद्धा येणार आहे. अतिशय संवेदनशील अशा विषयावर आधारित ‘मातफ’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविनाने थुकरटवाडीची वाट धरली यावेळी तिच्यासोबत या चित्रपटात काम केलेली मराठमोळी अभिनेत्री दिव्या जगदाळेसुद्धा उपस्थित होती. यावेळी रविनासोबत थुकरटवाडीच्या मंडळींनी एकच धम्माल उडवून दिली आणि या सर्वाला तिने खळखळून दादही दिली. कुशल बद्रिके आणि भाऊ कदमसह काही गाण्यांवर नफत्याचा ठेकाही धरला. तर पोस्टमन काका बनून आलेल्या सागर कारंडेच्या पत्राने तिच्या डोळय़ाच्या कडाही ओल्या झाल्या. एकंदरीत धम्माल मजा मस्तीसोबतच एका संवेदनशिल विषयावर प्रकाश टाकणारा हा भाग येत्या मंगळवारी रात्री 9.30 वाजता झी मराठीवरून प्रसारित होणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या सोमवारच्या भागात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ मालिकेची टीम हजर राहणार आहे. ज्यात दिलीप प्रभावळकर, नयना आपटे, सुकन्या कुलकर्णी मोने, प्रियदर्शन जाधव, सायली फाटक मालिकेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी, निर्माती मनवा नाईक आणि दिग्दर्शक स्वप्ननील जयकर आदींचा समावेश आहे.त

Related posts: