|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » आगामी चार दिवस आणखी होरपळीचे

आगामी चार दिवस आणखी होरपळीचे 

राज्यात तापमानाचा पारा चढताच  मुंबईत कमाल तापमानासह कोरडय़ा वातावरणाने काहिली 

प्रतिनिधी/ मुंबई

राज्यातील अर्ध्याधिक विदर्भ पट्टय़ासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटांचा इशारा हवामान विभागाने दिला असून रविवारी दिवसभर राज्यातील बहुतांश जिह्यांमधील कमाल तापमानाचा पारा 40 पार करून गेला होता. मुंबईतील कमाल तापमान 35 वर रेंगाळत असले तरीही आर्दतेत वाढ होत आहे.

हवामान विभागाकडून फेब्रुवारीच्या मध्यावरच राज्यातील उष्णतेच्या लाटांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले होते. त्यानुसार, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात गुजरात किनारीपट्टय़ावर चक्रीवादळ घोंगावत होते. या चक्रीवादळाने उष्णतेच्या लाटा निर्माण केल्या आहेत. पूर्व-उत्तरेकडील या लाटांचा प्रभावाने महाराष्ट्रातील तापमान वाढले आहे. उष्णतेच्या लाटेचे प्रमाण विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अधिक आहे. त्यामुळे येथील कमाल तापमानाने केव्हाच 40 अंश तापमान पार केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गेल्या आठवडय़ापासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट आहेत. मात्र, पुण्यावर वाऱयाच्या लहरींवर उष्णतेची लाटांचा प्रभाव असेल असा अंदाज आहे.

रविवारी कोकण-गोवा, मध्य-महाराष्ट्र व मराठवाडय़ाच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरीत भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली होती. तर मध्य महाराष्ट्र मराठवाडय़ाच्या उर्वरीत भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. राज्यांच्या उर्वरीत भागात कमाल तापमानात सरासरीच्या जवळपास होत आहे. आगामी चार दिवसात तापमानात वाढ होणार आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.