|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » विविधा » जेव्हा पंतप्रधान बालहट्ट पुरवतात …

जेव्हा पंतप्रधान बालहट्ट पुरवतात … 

ऑनलाईन टीम / सुरत   :
लहान मुलांचा बालहट्ट पालकांनी पुरवलेला आपण पहायला आहे परंतु कधी पंतप्रधानांनी कोणत्याही लहान बालिकेचा हट्ट पुरवलेला आपण पाहीला आहे का? परंतु चिमुरडीच्या आग्रहानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षयंत्रणा भेदून तिचा बालहट्ट पूर्ण केला. गुजरातच्या सुरतमध्ये हा प्रकार घडला आहे. सूरतमध्ये एका डेअरी प्रकल्पाची पाहणी करून पंतप्रधान मोदी पुढच्या कार्यक्रमासाठी जात होती. त्याचवेळी नॅन्सी नावाची चार वर्षांची चिमुकली मोदींच्या सुरक्षा ताफ्याच्या जवळ जाऊन त्यांना भेटण्याचा आग्रह धरू लागली.

ही बाब लक्षात आल्यानंतर मोदींनी स्वतः गाडी थांबवायला सांगून तिला जवळ बोलावले आणि तिच्याशी काही वेळ गप्पाही मारल्या. सुरतमधील एका हिऱयाच्या कंपनीत काम करण्याऱया कामगाराची ही मुलगी आहे. मुलीची भेटण्याचा आग्रह चक्क देशाच्या पंतप्रधानांनी पूर्ण केल्याने तिचे कुटुंबीयही सुखावले आहेत.