|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांना मारहाण

माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांना मारहाण 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांना मारहाण झाल्याची घटना सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये घडली. आंबेडकर भवन पाडल्यामुळे भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाली असल्याची माहिती आहे.

मुंबईतील आंबेडकर भवन पाडल्याच्या रागातून भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्यावर हल्ला चढवला. रत्नाकर गायकवाड हे शासकीय कामासाठी औरंगाबाद येथे सपत्नीक आले होते. त्यावेळी त्यांना मारहाण आणि धक्काबुक्की करण्यात आली. ही मारहाण भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी दोन महिलांसह चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत विमानतळावर हलवण्यात आले.

दरम्यान, हा हल्ला दुर्दैवी असून, याचा मी निषेध करतो. अशाप्रकारचा हल्ला करणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया आनंदराज आंबेडकर यांनी दिली.