|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मुंबई-गोवा महामार्गासाठी 11 हजार 747 कोटी मंजूर

मुंबई-गोवा महामार्गासाठी 11 हजार 747 कोटी मंजूर 

पेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

महामार्ग हरीत महामार्ग म्हणून विकसित करणार

झाडांच्या पुनर्रोपणासाठी एक टक्के रक्कम राखून ठेवणार

मुंबई / प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गाच्या महाराष्ट्रातील कामासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर केले असून हा संपूर्ण मार्ग हरित महामार्ग म्हणून विकसित करण्यात येणार आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाच्या आड येणाऱया झाडांचे पुनर्रोपण करण्यासह नवीन झाडांची लागवड आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्पाच्या 1 टक्के रक्कम राखून ठेवण्यात यावी, असे निर्देश पेंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

पेंद्र सरकारच्या विविध निधींतून महाराष्ट्रात चाललेल्या महामार्गांच्या कामांचा आढावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वांद्रे येथील कार्यालयात  गडकरी यांच्या उपस्थितीत सोमवारी घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्ग हा महत्त्वपूर्ण मार्ग जानेवारी 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या महामार्गाचे 20 हजार कोटींचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर केला असून त्यापैकी महाराष्ट्रातील मार्गासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गोवा महामार्गावरील कशेडी येथील 1.75 कि.मी. लांबीच्या बोगद्याच्या कामातील अडचणी दूर करून 2018 पर्यंत हे काम पूर्ण करावे. जानेवारी 2019 मध्ये गोवा महामार्गाचे उद्घाटन करण्याच्या दृष्टीने कामाला गती द्यावी, असे निर्देशही गडकरी  त्यांनी यावेळी दिले.

महामार्गावरील झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी जागतिक पातळीवरील कंपन्यांना आमंत्रित करुन योग्य कंपन्यांकडे हे काम देण्यात यावे. यापूर्वी या क्षेत्रात काम करणाऱया इच्छुक संस्थांना 15-20 कि.मी. लांबीमध्ये झाडांचे पुनर्रोपण आणि नवीन झाडे लावण्याचे काम वनविभागाच्या समन्वयातून पथदर्शी प्रकल्प म्हणून देण्यात यावे. महामार्गावरील झाडांचे पुनर्रोपण, नवीन लागवड आणि सौंदर्यीकरणाचे काम स्थापत्य काम करणाऱया कंत्राटदारांना न देता त्या क्षेत्रातील तज्ञ संस्था व कंपन्यांनाच दिले जावे. वफक्ष पुनर्रोपणाचे धोरण तयार करून ते पेंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवावे, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या. या बैठकीला सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री मदन येरावार, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार बाळा भेगडे आदी उपस्थित होते.

गोवा महामार्गाला समांतर मार्गाचाही अहवाल पूर्ण

गोवा महामार्गाला समांतर आणि डहाणू-वसई-अलिबागöश्रीवर्धन-दाभोळöगणपतीपुळे-रत्नागिरी-देवगड-मालवण ते वेंगुर्ला असा समुद्र किनाऱयाशेजारुन जाणारा कोकण पर्यटन सागरी महामार्ग हा कोकणातील पर्यटनाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या महामार्गाचा प्रकल्प अहवालही जवळपास पूर्ण झाला असून या कामाची निविदा प्रक्रिया येत्या 31 मेपर्यंत पूर्ण करुन कार्यादेश देण्यात यावेत, अशाही सूचनाही त्यांनी दिल्या.

सावित्री नदीवरील पुलाचे 5 जूनला लोकार्पण

महाडजवळील सावित्री नदीवरील पुलाचे लोकार्पण 5 जूनला करण्यात येईल, असे यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. गेल्यावर्षी पावसाळ्यात या नदीवरील पूल कोसळला होता. यामध्ये दोन एसटीबसेस वाहून गेल्या होत्या. त्यात अनेकांचा नाहक बळी गेला होता. या घटनेमुळे राज्यातील नदीवरील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने अखेर राज्यातील सर्व जुन्या पुलांचा सुरक्षेच्या दुष्टीने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सावित्री नदीवर युध्दपातळीवर नवीन पूल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. या पुलाचे लोकार्पण 5 जूनला करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Related posts: