|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्कोतील अभंग गायन स्पर्धेत किशोर तोरस्कर प्रथम

वास्कोतील अभंग गायन स्पर्धेत किशोर तोरस्कर प्रथम 

प्रतिनिधी / वास्को

मेस्तवाडा वास्को येथील श्रीराम मंदिरात श्रीराम विश्वकर्मा संस्थानतर्फे आयोजित केलेल्या मुरगाव तालुका मर्यादित अभंग गायन स्पर्धेत मेस्तवाडा वास्को येथील किशोर तोरस्कर याने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.

स्पर्धेचे दुसरे बक्षीस स्वप्नील गावकर तर तिसरे बक्षीस स्वेता संदीप मांद्रेकर हिला प्राप्त झाले. उत्तेजनार्थ बक्षिसे दक्षा सतीष परब, श्रृती गडेकर व राज शिरोडकर यांना देण्यात आली. मानसी प्रमोद च्यारी हिला खास बक्षीस देण्यात आले.

या स्पर्धेत एकूण वीस स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी स्पर्धकांना हार्मोनियमवर गोकुळदास च्यारी तर तबल्यावर दत्तराज च्यारी यांनी साथसंगत केली. स्पर्धेचे परीक्षण कृष्णनाथ च्यारी व विनयकुमार हेदे यांनी केले.

स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक नितीन नारायण बांदेकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी श्रीराम विश्वकर्मा संस्थानचे उपाध्यक्ष रूद्रेश्वर कमलाकांत च्यारी माशेलकर तसेच अंकुश च्यारी, गोकुळदास च्यारी, कृष्णनाथ च्यारी, विनयकुमार हेदे उपस्थित होते. यावेळी नितीन बांदेकर यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. रूद्रेश्वर च्यारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रास्ताविक अंकुश च्यारी यांनी केले.

बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक दाजी साळकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका रोचना बोरकर, संस्थानचे अध्यक्ष देवानंद मनोहर च्यारी, अंकुश च्यारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. साळकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात आली. स्पर्धेचे निवेदन प्रविणा च्यारी यांनी केले.

उद्घाटनपर कार्यक्रमात सुहास लिमये व प्रकाश च्यारी यांनी अभंग सादर केले. परीक्षक कृष्णनाथ च्यारी व विनयकुमार हेदे यांनी भैरवी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक च्यारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश च्यारी, राजेंद्र च्यारी व सचिन च्यारी यांचे सहकार्य लाभले.

Related posts: