|Tuesday, July 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिवजयंती मंडळांच्या समस्या सोडवाव्यात

शिवजयंती मंडळांच्या समस्या सोडवाव्यात 

प्रतिनिधी/ बेळगाव

अक्षय्यतृतीयेला परंपरेनुसार शिवजयंती उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. मात्र शिवजयंती आणि चित्ररथ मिरवणूक काढताना मंडळांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी तसेच चित्ररथ पाहण्यासाठी येणाऱया नागरिकांसाठी ठिकठिकाणी गॅलरीची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. यामुळे अधिकाऱयांची बैठक घेण्याची मागणी सत्ताधारी गटनेते पंढरी परब यांनी महापौरांकडे केली आहे.

मुंबई-पुणे शहरांपेक्षाही बेळगाव शहरात मोठय़ा प्रमाणात चित्ररथ मिरवणूक काढण्यात येते.  पण विविध शिवजयंती उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच चित्ररथ पाहण्यासाठी येणाऱया नागरिकांची गैरसोय होते. यामुळे शिवजयंती उत्सव मंडळांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापौरांनी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ आणि विविध मंडळांच्या पदाधिकाऱयांची बैठक घेवून समस्या जाणून घ्याव्यात. तसेच नागरिकांसाठी प्रेक्षक गॅलरी उभारण्याची गरज आहे.

धर्मवीर संभाजी चौकासह टिळक चौक, हेमू कलानी चौक, रामलिंगखिंड गल्ली अशा विविध ठिकाणी प्रेक्षक गॅलरीची सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्तांची बैठक आयोजित करून आवश्यक सूचना करण्यात याव्यात, अशी विनंती  पंढरी परब यांनी महापौरांना केली आहे.

Related posts: