|Saturday, February 23, 2019
You are here: Home » Top News » अयोध्या, तिरंगा, गंगेसाठी जीव गेला तरी बेहत्तर : उमा भारती

अयोध्या, तिरंगा, गंगेसाठी जीव गेला तरी बेहत्तर : उमा भारती 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अयोध्या, तिरंगा, गंगेसाठी जीव गेला तरी बेहत्तर, अयोध्येत राम मंदिर निर्माण होणारच, त्यासाठी जीव देण्यासह आम्ही तयार आहोत, असे वक्तव्य केंद्रीय गंगा पुनरुत्थान मंत्री उमा भारती यांनी केले.

बाबरी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भाजप नेत्यांविरोधात कट रचल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हेगारी खटला चालवण्याचे आदेश दिले. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांचे नावांचा समावेश आहे. यावर बोलताना उमा भारती म्हणाल्या, कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत राम मंदिर होणारच. आयोध्या, तिरंगा, गंगेसाठी जीव गेला तरी बेहत्तर. बाबरी मशिदप्रकरणी आम्ही कोणताही कट रचला नव्हता. मात्र, न्यायालयाचे आभार मानतो आणि न्यायालयाने जे आदेश दिले आहेत ते आम्हाला मान्य आहेत.

दरम्यान, उमा भारती यांनी काँग्रेसवरही शरसंधान साधले, त्या म्हणाल्या, काँग्रेसला आमच्यावर आरोप करण्याचे कोणतेही नैतिक अधिकार नाहीत.

Related posts: