|Saturday, July 29, 2017
You are here: Home » Top News » प्रादेशिक भाषा जिवंत ठेवणे आवश्यक : श्री. श्री. रविशंकर यांची अपेक्षाप्रादेशिक भाषा जिवंत ठेवणे आवश्यक : श्री. श्री. रविशंकर यांची अपेक्षा 

पुणे / प्रतिनिधी :

चीन, जपान, फ्रान्स, जर्मनी या देशांनी आपल्या भाषांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी इंग्रजीतील पुस्तके स्वःतच्या भाषेत अनुवादित केली आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषेचा प्रभाव आणि तिचे महत्त्व टिकून आहे. आपल्या देशातील मराठी, तामिळ, मल्याळम्, तेलगू यासारख्या भाषांवर संस्कृतचा प्रभाव आहे. आता या भाषातील संस्कृत शब्दांची जागा इंग्रजी घेत आहे, हे टाळले पाहिजे आणि आपल्या भाषांना जिवंत ठेवणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा अद्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.
विश्व हिंदी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित ‘विश्व वागेश्वरी सन्मान’ सोहळ्यात ते बोलत होते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पं. दीनदयाळ ट्रस्टचे विनोद शुक्ल, विश्व हिंदी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आशिष कंदवे व अन्य उपस्थित होते. या वेळी हिंदी साहित्याबरोबरच अन्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱया डॉ. कांतीलाल हस्तीमल संचेती, डॉ. अरूणा ढेरे, डॉ. विन्देश्वर पाठक यांच्यासह अन्य मान्यवरांना ‘विश्व वागेश्वरी सन्मान’ प्रदान करण्यात आला.
श्री श्री रविशंकर म्हणाले, भारतीय भाषा आणि संस्कृती या दोन्ही गोष्टी अध्यात्माशी जोडल्या गेलेल्या आहेत. अध्यात्मामुळे आपण ज्या प्रकारे जवळ येतो, त्याप्रमाणेच भाषांमुळेदेखील आपण जवळ यावे व भाषांचे संवर्धन करावे. कारण, भाषेमधून आपली संस्कृती दिसत असते आणि ती त्यामुळेच समृद्ध होत असते. एखाद्या परकीय भाषेचा प्रभाव पडून आपल्या बोलीभाषेचा स्वभाव बदलता कामा नये.
पाटील म्हणाल्या, आपल्या सभोवती असलेल्या समाजाचा साहित्यावर सखोल परिणाम होतो. त्यामुळे साहित्याला समाजाचा आरसा म्हणणे योग्य आहे. साहित्यातील भाषा ही इंद्रधनुष्यासारखी असते, ज्यामध्ये विविध छटांचा समावेश असतो. जो समाज समृद्ध असतो, तेथील साहित्यदेखील समृद्ध असते. समृद्ध साहित्याची निर्मिती करणाऱया साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!