|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » Top News » यंदाच्या वसंत व्याख्यानमालेत दिग्गजांची मांदियाळी

यंदाच्या वसंत व्याख्यानमालेत दिग्गजांची मांदियाळी 

पुणे / प्रतिनिधी :

वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमाला येत्या 21 एप्रिल ते 20 मेदरम्यान टिळक स्मारक मंदिर येथे रंगणार आहे. यंदा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, महापौर मुक्ता टिळक, भाजपाचे सुधींन्द्र कुलकर्णी, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्यासह अनेक दिग्गज यात सहभागी होणार असल्याची माहिती कार्यवाह डॉ. मंदार बेडेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

येत्या 21 एप्रिलला सायंकाळी 6.30 वाजता टिळक स्मारक येथे व्याख्यानमालेचे उद्घाटनाचे सत्र होणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या सत्राची सुरुवात करतील. अध्यक्षस्थानी वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक असतील. 22 ला ‘दहशतवाद ः पूर्वी, आता आणि उद्या’ या विषयावर भानूप्रताप बर्गे आपले विचार व्यक्त करतील. 23 एप्रिलला सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील विचार मांडतील. 28 एप्रिलला ‘इतिहासतील प्राणिविश्व’ या विषयावर ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर आपली मते मांडतील.

30 ला भाजपाचे सुधींद्र कुलकर्णी ‘भारत-पाकिस्तान संबंध’ या विषयावर बोलतील. 6 मे रोजी पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ ‘मानवाची उत्क्रांतीगाथा’ यावर बोलतील. 8 मे रोजी यशस्वी महिलांचा परिसंवाद होईल. 20 मे रोजी पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती यांच्या हस्ते व्याख्यानमालेचा समारोप होईल.

Related posts: