|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » व्हीव्हीपीएटी यंत्र खरेदीला मंजुरी ; केंद्राकडून 3 हजार कोटींचा निधी

व्हीव्हीपीएटी यंत्र खरेदीला मंजुरी ; केंद्राकडून 3 हजार कोटींचा निधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

क्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल मशिन घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यासाठी केंद्राकडून 3 हजार 714 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, देशभरातील विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचा विजय ईव्हीएममध्ये फेरफार केल्यानेच झाला असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने व्हीव्हीपीएटी घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मतदाराला मतदान केल्यावर कोणाला मत दिले याची पावतीही मिळणार आहे.