|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जखमी मुलांना वाचविण्याची धडपड व्यर्थ

जखमी मुलांना वाचविण्याची धडपड व्यर्थ 

स्फोटात जखमी मुलाला उचलून धावला छायाचित्रकार

 मदत करण्याच्या भावनेत कॅमेऱयाचा पडला विसर

वृत्तसंस्था/ अलेप्पो

 सीरियाच्या अलेप्पो सिटीत झालेल्या आत्मघाती हल्ल्यात जखमी मुलाचा जीव वाचविण्यासाठी एक छायाचित्रकार त्याला कुशीत घेऊन धावला. मुलाला वाचविण्याच्या या प्रयत्नाची छायाचित्रे सोशल मीडियावर पसरत आहेत. अथक प्रयत्नानंतरही मुलाचा जीव वाचू न शकल्याचे समजताच छायाचित्रकाराला रडू कोसळले.

अलेप्पोच्या राशिदिन भागाच्या काही क्षेत्रांमध्ये अजूनही आयएस दहशतवाद्यांचा कब्जा आहे. रविवारी शरणार्थींना नेणाऱया बसेसचा ताफा या भागात काही वेळासाठी थांबला होता. याचदरम्यान एका आत्मघाती हल्लेखोराने मुलांना चिप्सच्या पाकिटाचे आमिष देत आपल्या दिशेने बोलाविले. शेकडो मुले स्वतःजवळ पोहोचताच या हल्लेखोराने स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात 120 जणांचा जीव गेला, ज्यात 80 मुले आणि 13 महिला देखील सामील होत्या.

सहकाऱयाने टिपला क्षण

स्फोटादरम्यान छायाचित्रकारांचे एक पथक तेथून जात होते. छायाचित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता अब्द अल्काहारने दोन मुलांना वेदनेने विव्हळताना पाहिले. एका मुलाला उचलून अब्द मदतीसाठी धावले, परंतु जखमी मुलाने त्यांच्या कुशीतच अखेरचा श्वास घेतला. यानंतर अब्द दुसऱया मुलाला उचलून धावले परंतु त्याचाही जीव वाचू शकला नाही. स्फोटा मुलांच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या अब्द यांना अश्रू अनावर झाले. या पूर्ण घटनेची छायाचित्रे अब्द यांच्या सहकाऱयानेच टिपली आहेत.

त्याने माझात घट्टपणे पकडला होता !

हे एक क्लेशदायक दृश्य होते, जे मी कधीच विसरू शकत नाही. तेथे सर्वच दिशेने मुलांचे मृतदेह पसरले होते. फक्त दोन मुले मला तडफडत असल्याचे दिसून आले. मी त्यांच्या मदतीसाठी धावलो, परंतु तोपर्यंत एकाचा मृत्यू झाला होता. तर दुसऱया मुलाला उचलून त्याच्या मदतीसाठी धावलो, तो काहीही बोलू शकत नव्हता. त्याने माझा हात घट्टपणे पकडून ठेवत माझ्याकडे एकटकपणे पाहत होता. परंतु याच्या एक मिनिटानंतरच त्याचे श्वास थांबले. मी त्याचा जीव वाचू शकला नाही असे अब्द यांनी एका मुलाखतीत सांगितले.