|Sunday, November 18, 2018
You are here: Home » क्रिडा » पारुपल्ली कश्यप, हर्षल उपउपांत्यपूर्व फेरीत

पारुपल्ली कश्यप, हर्षल उपउपांत्यपूर्व फेरीत 

वृत्तसंस्था/ बीजिंग

तब्बल तीन महिन्यांनतर दुखापतीतून सावरणाऱया व भारताचा स्टार बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप व युवा हर्षल दानी यांनी शानदार खेळाचे प्रदर्शन घडवताना चायना ओपन ग्रांप्रि स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

बुधवारी झालेल्या दुसऱया फेरीतील लढतीत जागतिक क्रमारीत 104 व्या स्थानी असलेल्या पारुपल्ली कश्यपने थायलंडच्या सुपान्येला 21-16, 21-17 असे नमवताना अंतिम 16 प्रवेश मिळवला. तीन महिने बॅडमिंटन कोर्टपासून दूर असलेल्या कश्यपची बॅडमिंटन क्रमवारीत तब्बल 104 व्या स्थानी घसणर झाली आहे. प्रारंभापासून आक्रमक खेळणाऱया कश्यपने या लढतीत थायलंडच्या या सुपान्येला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. पहिला गेम कश्यपने 21-16 असा जिंकल्यानंतर दुसऱया गेममध्ये सुपान्येने दुसऱया गेममध्ये त्याला चांगलीच टक्कर दिली. पण, अनुभवपणास लावताना कश्यपने दुसरा गेम 21-17 असा जिंकत विजय मिळवला. पुरुषांच्या अन्य लढतीत युवा हर्षल दानीने चीनच्या यान रुनझेला 21-16, 22-20 असे पराभूत करताना पुढील फेरीत प्रवे मिळवला. विशेष म्हणजे, पुढील आठवडय़ापासून आशियाई बॅडमिंटन स्पर्धा सुरु होत असल्याने या स्पर्धेत स्टार खेळाडूंनी प्रवेश घेतलेला नाही.

Related posts: