|Friday, July 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सुगम-दुर्गम यादीला सदस्यांचा विरोधसुगम-दुर्गम यादीला सदस्यांचा विरोध 

प्रतिनिधी/ सातारा

जिह्यातील 2 हजार 716 शाळा पैकी 528 शाळा दुर्गम झाल्या आहेत. हा करण्यात आलेला सर्व्हे चुकीच्या पद्धतीने केला गेला आहे. सर्व्हे पुन्हा त्रयस्थ संस्थेमार्फत योग्य निकषानुसार करण्यात यावा अशी मागणी अनेक सदस्यांनी करत शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यादीला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे अध्यक्ष संजीवराजे यांनी यादीत संदिग्धता असल्याने फेर सर्व्हे करुन त्यामध्ये बदल करण्यात यावा या मागणीचा ठराव घेवून शासनाकडे पाठवण्यात येत आहे, असे सभागृहात जाहीर केले. त्याला सर्वच सदस्यांनी अनुमोदन दिले. माण, कोरेगाव, खटाव आणि सातारा तालुक्यावर अन्याय झाल्याची सदस्यांनी खदखद व्यक्त केली.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे आणि समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड यांच्यासह सर्वच सदस्य उपस्थित होते.

माण तालुक्यामध्येही चुकीचा सर्व्हे

या सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी शिक्षकांच्या बदल्याबाबत आलेल्या अद्यादेशानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 528 शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. सदस्य म्हणून या यादीवर आक्षेप आहे. ही यादी पूर्नवस्तुस्थिती बघून फेर सर्व्हे करण्यात यावा, जेणेकरुन खरोखरच दुर्गम शाळा आहेत, त्यांचा समावेश या यादीत होईल. माण तालुक्यामध्येही चुकीचा सर्व्हे झाला आहे. सीईओंना भेटून विनंतीही केली होती. तरीही यादी त्याच पद्धतीने जाहीर झाल्याची खदखद सदस्यांनी बोलून दाखवली. सुनिता कदम यांनी खटाव तालुक्यातील म्हासुर्णेची शाळा दुर्गममध्ये गेलीच कशी? अडचणीच्या ठिकाणच्या शाळा सोडल्या अन् चांगल्या ठिकाणच्या शाळा घेतल्या कशा? असा सवाल व्यक्त केला आहे.  मानसिंगराव यांनी ही यादीच फेटाळून लावा, नव्याने एक समिती गठीत करा, अशी मागणी केली. भारती पोळ यांनी माण तालुक्यावर अन्याय झाल्याचे कथन केले. मनोज घोरपडे यांनी सातारा तालुक्यातील केवळ 12 च शाळा कशा? डोंगरी भागातील शाळांचा समावेश का नाही, असा मुद्दा उपस्थित केला. मंगेश धुमाळ यांनी कोरेगाव तालुक्यामध्ये 13 शाळा घेतल्या गेल्या. चवणेश्वर या शाळेचा समावेश केला आहे. इतर शाळांचा का नाही? सवाल उपस्थित केला. दीपक पवार यांनी ही आक्षेप घेतला. त्यानुसार सर्व यादीचा फेर सर्व्हे करण्याबाबत शासनाकडे मागणी करण्याचा ठराव घेवून प्रस्ताव पाठवूया अशी विनंती केली, त्याला सर्वांनीच मान्यता दिली.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!