|Saturday, July 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अनेक पदाधिकारी राजीनाम्याच्या पवित्र्यातअनेक पदाधिकारी राजीनाम्याच्या पवित्र्यात 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिह्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर करणाऱया शिवसैनिकांची संख्या मोठी आहे. मात्र, पदासाठी कोणीही पुढे येत नाही, ही अवस्था सेनेत असून अनेकदा पदाधिकारी निवडी कशा पद्धतीने झाल्या याचेच राजकारण सध्या सेनेत सुरु आहे. सध्याही पदाधिकारी निवडीच्या हालचाली सुरु असून तत्पूर्वीच सोशल मीडियावर संदोपसुंदी सुरु झाली असून अनेक पदाधिकाऱयांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. सोशल मीडियावर ही खदखद उफाळून येवू लागली आहे.

जिह्यात शिवसेनेला अनेकदा चांगले दिवस आले होते. तत्कालिन संपर्कप्रमुख दगडूदादांच्या अगोदरही शिवसेना स्टाईल चर्चेत राहयची ती आंदोलनासाठी. सत्ता नसली तरीही सेनेच्या नावाचा दरारा होता. निष्ठावान सैनिकांची आजही सेनेवर निष्ठा कायम आहे. मात्र, अलिकडच्या काळात सेनेतील काही वरिष्ठ पदाधिकाऱयांकडून निवडी करताना दुजाभाव केला गेला. चमकोगिरी करणाऱयांना संधी दिली गेली. प्रत्यक्षात सेनेचे कार्य कमी आणि इतर पक्षाच्या हिताच्या गोष्टी यांनी केल्याचे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमी चर्चा असते.

विद्यमान जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे यांचे जिल्हाप्रमुख म्हणून काम कमीच असते. पदाचा वापर इतर कारणासाठी. दुसरे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या बाबतीत वेगळे कारण नाही. त्यांच्यामुळे पाटण तालुक्यात सेनेची पंचायत समितीतील सत्ता गेली, असा आरोप होवू लागला आहे. यामुळे विद्यमान पदाधिकाऱयांबाबत तळागाळातील शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी सुरु आहे. ती कामे होत नसल्याबाबत. ही कैफियत अनेक शिवसैनिकांनी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्याकडे वारंवार बोलून दाखवली. मात्र, त्याची खदखद आता सोशल मीडियावर उफाळून येत आहे. यामुळे उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!