|Saturday, July 29, 2017
You are here: Home » उद्योग » भारताची आर्थिक स्थिती उत्तमभारताची आर्थिक स्थिती उत्तम 

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था :

गेल्या काही वर्षात भारताचा वेगाने विकास होत आहे. यामुळे देशाची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. सरकारने करचोरी करणाऱयांविरोधात कठोर पावले उचलण्याने त्याचा परिणाम दिसून आला असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अधिकाऱयाने म्हटले.

सरकारच्या आवाहनानंतर सिलिंडरवरील अनुदान अनेक लोकांनी नाकारले आहे. याचप्रमाणे सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ सामान्यांना मिळत आहे. सामाजिक उपक्रमांसाठी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात जीडीपीच्या 3.5 टक्के निधी मंजूर केला आहे. भारतीय अधिकाऱयांबरोबर आपण चर्चा करत आहोत. आर्थिक सुधारणेसाठी खर्च नियंत्रण आणि पायाभूत सुविधांची निर्मिती, करविस्ताराचे होणारे फायदे यासंबंधात सहकार्य सुरू असल्याचे नाणेनिधीच्या आर्थिक व्यवहार विभागाचे संचालक विटर गास्पर यांनी म्हटले.

भारत ही एकच संपूर्ण बाजारपेठ निर्माण होण्यासाठी वस्तू आणि सेवा कर प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावेल. भारतात प्राप्तिकर असमानता आहे. भविष्यात यात समाधानकारक वाढ होत प्राप्तिकर भरणाऱयांची संख्या वाढेल. सध्या भारताला मध्यम कालावधीच्या योजनांवर भर देणे गरजेचे आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांत असमानतेमध्ये वाढ होत आहे. 1980 पासून आंतरराष्ट्रीय पातळीवर 1 अब्जापेक्षा अधिक लोकांना दारिद्रय़ातून मुक्त करण्यात यश आले असून भारत आणि चीनमधील लोकांची अधिक संख्या आहे. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आर्थिक सुधारणा होण्यास मदत झाली आणि देशातील एककेंद्राभिमुखतेत वाढ झाली, असे त्यांनी म्हटले.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!