|Tuesday, August 1, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » श्नमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेचे पुरस्कार जाहीरश्नमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेचे पुरस्कार जाहीर 

प्रतिनिधी /इचलकरंजी :

     येथील श्नमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने यावर्षीचे गौरव पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. यामध्ये तरूण भारत इचलकरंजी कार्यालयाचे मुख्यप्रतिनीधी अतुल भोसले यांना पत्रकार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. श्नाrमंत ना. बा. घोरपडे नाटय़गृह येथे 23 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

    वर्धापनदिन सोहळा, अमृता कदम लिखित पुस्तक प्रकाशन व राज्यस्तरीय श्नमशक्ती गौरव पुरस्काराचे वितरण असा संयुक्त कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, नगराध्यक्षा ऍड. अलका स्वामी तर प्रमुख पाहुणे मराठी चित्रपट अभिनेते व नाटय़ दिग्दर्शक प्रकाशचंद्र शिंदे, मराठी चित्रपट अभिनेत्री शिल्पा गोंजारी, बाळ महाराज, सभापती रेश्मा सनदी, पो. निरीक्षक सतिश पवार, पो. निरीक्षक मोहन राणमाळे, लक्ष्मणराव गोर्डे उपस्थित असणार आहेत.

      पुरस्कार प्राप्त मान्यवर असे, बालकिर्तनकार अवधून कोरडे, देवमामा तानाजी पाटील, विनोदी नाटक ताकतुंबा, ऍड. विश्वास चुडमुंगे, सुभाष काडाप्पा, डॉ. अभिषेक कोल्हापुरे, विश्वनाथ घाणेकर, -कबनूर, सागर पाटील, संगीता ठोंबरे, शिवाजी गोरे, शशिकांत पाटील, दत्ता पाटील, -कोरोची, रावसाहेब भिसे, महेश सुतार, शिवाजी पाटील, नगरसेवक मनोज हिंगमिरे, उदय धातुंडे, अमितकुमार बियाणी, राजेंद्र आसोळे, गजल पान शॉप, रमेश इंगवले, सागर बाणदार, विद्या चंदुरे, दिगंबर नागावकर, दिलीप म्हेत्रे, प्रकाश चौगुले, -इचलकरंजी, दत्ताजीराव देसाई-हिरलगे, संभाजी देसाई, -गडहिंग्लज, अभय काश्मिरे-रूई, बबन चौगुले,-दत्तवाड, सुनिता जोंग-आगर, बसगोंडा पाटील-चंदूर, डॉ. संदिप खोत, शामली भगत, सुकुमार कोळी, -तारदाळ, देवाप्पा गावडे-दानोळी, मिना कांबळे-खोतवाडी, बाळासाहेब वाशीकर-वाशी, बाळासाहेब मगदूम-कुन्नूर, अलका भिलवडे-वाळवा, रघुनाथ नांगरे-भादोले, शाम कांबळे, -शहापूर, दिगंबर कांबळे-शिरढोण, रावसाहेब भोसले, विजयानंद माने, -यड्राव, सिध्दी बहुद्देशीय सेवाभावी संस्था-आळते, अशोक रास्ते-सांगली याचबरोबर नाशिक, औरंगाबाद, नांदेड, लातूर, पुणे, मुंबई, सातारा, रत्नागिरी येथील व्यक्तींना पुरस्कार जाहीर केलेला आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!