|Sunday, July 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रामचंद्र महाराज यादव समितीतर्फे ज्ञानेश्वरी पारायणरामचंद्र महाराज यादव समितीतर्फे ज्ञानेश्वरी पारायण 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

रामचंद्र महाराज यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त सद्गुरू रामचंद्र महाराज सोहळा समितीतर्फे ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सोहळ्याचे आयोजन केले आहे. शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नर जवळील ज्ञानदेव सदन येथे शुक्रवार (दि.21) ते गुरूवार (दि. 27) दरम्यान हा सोहळा आहे. यामध्ये भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन यांचा समावेश असल्याचे सोहळा समितीने पत्रकाद्वारे कळविले आहे.

   सदर सोहळ्यामध्ये सोमवार दि. 24 रोजी सायंकाळी 5 वाजता वारकरी ज्ञानभूषण पुरस्कार सोहळा आहे. बुधवारी 26 रोजी दुपारी 4 वाजता दिंडी नगरप्रदक्षिणा तसेच गुरूवारी 27 रोजी सकाळी 10 ते 12 वेळेत काल्याचे कीर्तन होणार आहे. तसेच दुपारच्या वेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये सदाशिव सुतार महाराज, हिंदूराव महाराज, पुरूषोत्तम आनंददास, जगन्ना महाराज पाटील, बाबुलालजी बोरसे महाराज, शहाजी महाराज पाटील, पूर्णानंद महाराज काजवे, पांडुरंग महाराज, प्रभू महाराज वासकर प्रवचन आणि कीर्तन करणार आहेत. सरस्वती दत्त महाराज समाधी मंदिर भजनी मंडळ, बालाजी भजनी मंडळ, शिवगणेश भजनी मंडळ, हरिप्रिया भजनी मंडळ तसच आदींचे भजन होणार आहेत. तरी या सोहळ्याचा भक्त मंडळांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सोहळा समितीतर्फे पत्रकाद्वारे केले आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!