|Sunday, July 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » माध्यमिक शाळा सहशिक्षक नेमणुकीसाठी कौन्सिलिंग सुरूमाध्यमिक शाळा सहशिक्षक नेमणुकीसाठी कौन्सिलिंग सुरू 

प्रतिनिधी /बेळगाव :

बेळगाव विभागस्तरावरील सरकारी माध्यमिक शाळा सहशिक्षकांच्या नेमणुकीसाठी गुरुवारपासून कौन्सिलिंगला सुरुवात झाली आहे. येथील सरकारी बीएड् महाविद्यालयाच्या वसतीगृह आवारात कौन्सिलिंग सुरू आहे. पहिल्या दिवशी गुरुवारी बेळगाव जिल्हा आणि बागलकोट जिल्हय़ातील उमेदवारांसाठी कौन्सिलिंग झाले. मात्र कौन्सिलिंग दरम्यान दूरवरून आलेल्या उमेदवारांसाठी योग्य ती सुविधा उपलब्ध करून देण्यात न आल्याने उमेदवारांना त्रास सहन करावा लागला. तर कौन्सिलिंग दरम्यान अर्ज पडताळणीच्या कामास विलंब झाल्याने रात्री उशिरापर्यंत कौन्सिलिंगचे काम सुरू होते.

सकाळी 10.30 वाजता बेळगाव जिल्हय़ासाठी कौन्सिलिंगचे काम सुरू होणार होते. मात्र या कामास विलंब झाला. बेळगाव जिल्हय़ातून एकूण 29 उमेदवार कौन्सिलिंगसाठी हजर होते. तर बागलकोट जिल्हय़ातून 62 उमेदवार हजर होते. दि. 22 एप्रिलपर्यंत कौन्सिलिंग सुरू राहणार असून शुक्रवार दि. 21 रोजी धारवाड आणि गदग जिल्हय़ातील उमेदवारांसाठी कौन्सिलिंग होणार आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी सकाळी 10.30 वाजता बेळगाव जिल्हय़ासाठी तर दुपारी 3 वाजता बागलकोट जिल्हय़ातील उमेदवारांसाठी कौन्सिलिंगचे आयोजन केले होते. मात्र बागलकोट जिल्हय़ातील बहुसंख्य उमेदवार सकाळीच या ठिकाणी हजर झाले होते. त्यांना रात्री उशिरापर्यंत कौन्सिलिंगसाठी थांबावे लागले.

बेळगाव जिल्हय़ातील 29 उमेदवारांचे कौन्सिलिंगचे काम सायंकाळी संपले. त्यानंतर बागलकोट जिल्हय़ातील उमेदवारांसाठी कौन्सिलिंगचे काम हाती घेण्यात आले. या जिल्हय़ातून 62 उमेदवार हजर राहिले होते. यामुळे अर्ज पडताळणीच्या कामास बराच उशीर लागत होता. यामुळे बागलकोट जिल्हय़ातील वेगवेगळय़ा ठिकाणाहून आलेल्या उमेदवारांना रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी थांबावे लागले. यामध्ये काही महिलांनी आपल्या छोटय़ा मुलांसह हजेरी लावली होती. कौन्सिलिंगच्या कामास बराच विलंब झाल्याने अनेक उमेदवारांनी परिसरातील हिरवळीवर तर काही जण झाडाच्या सावलीत आडवे झाल्याचे दिसून आले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!