|Tuesday, May 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहराच्या विविध भागाला वाहतूक कोंडीचा फटकाशहराच्या विविध भागाला वाहतूक कोंडीचा फटका 

बेळगाव : नव्या उड्डाणपूलावर पुन्हा एकदा असे चित्र दिसून आले.

प्रतिनिधी /बेळगाव :

संचयनी सर्कलनजीक एक बस बंद पडल्याने मध्यवर्ती भागातील वाहतूकीचा पुन्हा एकदा बोजवारा उडाला आणि याचा मनस्ताप नागरिकांना सोसावा लागला. शहराच्या विविध भागात रहदारीची कोंडी होऊन रहादारी नियंत्रणाचे तीन तेरा झाल्याचे दिसून आले. शनिमंदिरानजीक रेल्वे उड्डाणपूलावर पुन्हा एकदा नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

सायंकाळी सहाच्या सुमारास संचयनी सर्कलनजीक एक बस नादुरूस्त झाली. त्यामुळे ही बस रस्त्यातच उभी राहिली. त्यापाठोपाठ अनेक वाहने या बसच्या मागे उभी राहिली. त्यामुळे थोडय़ाच वेळात अनेक वाहनांची रांग येथे लागली. कॅम्पमधील खानापूर रोडसह स्टेशन रोड, पाटील गल्ली परिसरातही वाहनांची गर्दी झाली. त्यामुळे कपिलेश्वर मार्गावरील नव्या रेल्वे उड्डाणपूलनजीकही वाहतूकीचा बोजवारा उडाला. या कोंडीमुळे नागरिकांना येथे आपल्या दुचाकी आणि इतर वाहने पुढे नेताना समस्यांना सामोरे जावे लागले.

Related posts: