|Friday, July 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » सांगली » उजनी धरण 6 टक्यांवरउजनी धरण 6 टक्यांवर 

पंढरपूर / प्रतिनिधी :

सोलापूर जिल्हयासाठी वरदायिनी असणा-या उजनी धरणांची पातळी सध्या 6 टक्यांवर येउन ठेपली आहे. सध्यांच्या कडक उन्हाळा आणि येणारा वैशाख वणवा पाहाता बाष्पीभवनामुळे उजनीची पातळी अजून खालावणार आहे. त्यामुळे साहजिकच पाणीटंचाईची मोठी झळ आगामी काळात बसणार आहे.

   उजनी धरणावर सोलापूर जिल्हयाचा पिण्यांचा आणि शेतीचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. गत महीन्यातच 5 मार्चला उजनीतून पिण्यांच्या पाण्यासाठी विसर्ग सोडण्यात आला होता. तरी देखिल वाढत्या उन्हांची बसणारी झळ आणि उष्माघातामुळे पाण्याचे मोठया प्रमाणावर बाष्पीभवन झाले आहे. अशातच पाणीपातळी देखिल मोठी खालावलेली दिसून येत आहे.

  सन 2016 मधे झालेल्या पावसामुळे मृत 20 टक्यांहून अधिक असलेली उजनी धरणाचीं पाणीपातळी ही जिवंत झाली होती. आणि यातूनच उजनी धरण हे सुमारे 110 टक्यांवर जाउन पोहोचले होते. त्यानंतर साहजिकच वर्षभर पाण्यासाठी कसलाही सामना करावा लागणार नसल्यांचे बोलले जात होते. अशातच डिंसेबर 2016 मधे पाणीटंचाई जाणवू लागली. त्यावेळी पिण्यांच्या पाण्यासाठी उजनी धरणातून पाण्याचा साठा सोडण्यात आला होता. त्यानंतर परत एकदा फ्sढब्रुवारी महीन्यांच्या अखेरीस पाणीटंचाईचा प्रश्न समोर आला. यावेळी देखिल मार्च महीन्यांच्या पहील्या आठवडयात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे साहजिकच सदरच्या पाण्याने जिल्हयातील पिण्यांच्या पाण्याचा पुरवठा करणारे सर्व बंधारे हे तीन मीटरपर्यत भरून घेण्यात आले होते. मात्र सदरचे बंधारे भरून झाल्याच्या एक महीन्यानंतर परत एकदा पाणीटंचाईचा प्रश्न ऐsरणीवर आला आहे. कारण अनेक बंधा-यामधे भरलेले पाणी हे नदीकाठच्या शेतक-यांनी मोटारीने ओढून घेतले आहे. त्यामुळे साहजिकच मोठया प्रमाणावर तेथील पाणीपातळी ही खालावली गेली आहे. अशा परिस्थितीमधे मात्र कालव्यांचा आधार न घेता नदीकाठच्या शेतक-यांच्या विहीरी हया संपूर्णपणे भरलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे पाणी असताना देखिल त्यांचे नियोजन आणि राखण करता न आल्यामुळे वैशाख वणव्यांत उजनीच्या पाण्याचे बाष्पीभवन होणार असून यातून पाणीटंचाईचा सामना सोलापूर जिल्हा वासिंयाना करावा लागणार आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!