|Thursday, July 27, 2017
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नांगरे पाटील आज सांगली पोलीसांची खरडपट्टी करणारनांगरे पाटील आज सांगली पोलीसांची खरडपट्टी करणार 

प्रतिनिधी /सांगली :

  चोरावर मोर होऊन नऊ कोटीहून अधिक रक्कम ढापल्याचा गुन्हा दाखल झाल्याने निलंबीत पोलीस आणि अधिकाऱयांची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव सुरू झाली आहे. चोर पोलीसांच्या संगनमताच्या या घटनेबरोबरच आरगमध्ये उघडकीस आलेला गुटखा कारखाना, खुलेआम सुरू असलेला मटका आणि महैसाळ प्रकरणी अनेक वर्षे डोळयावर झापड असलेले पोलीस यामुळे जिल्ह्याची देशात पुरती बदनामी झाली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयाचे सुपूत्र असणारे विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे पाटील आज पोलीसांच्याच कार्यक्रमाच्या निमीत्ताने सांगली दौऱयावर येत आहेत. नांगरे-पाटील जिल्हा पोलीसांची चांगलीच खरडपट्टी करण्याची शक्यता आहे.

 नांगरे-पाटील पाटील यांच्या दौऱयामुळे पोलीस दलात चर्चेला उधान आले आहे.  खुलेआम सुरू असलेले अवैध व्यवसाय आणि सातत्याने उघडकीस येणाऱया घटना यामुळे जिल्हा पोलीस दलाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. यापुर्वी अनेक वर्षे सामान्यामध्ये असलेला खाकीचा असलेला रूबाब आणि विश्वास संपला आहे. सरकारी पगारावर अवैध व्यवसायिकांशी प्रामाणिक राहणारे अशीच पोलीसाची प्रतिमा तयार झाली आहे. दररोज मटका आणि दारूवर कागदोपत्री कारवायांचे घोडे नाचवण्यात येत आहेत. पण बहुतांशी गुन्हे पंटरवरच दाखल होत आहेत. त्यामुळे खुलेआम मटका आणि दारूचा महापूर निर्माण झाला आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!