|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मुलायम यांच्या घरी वीज विभागाचा ‘छापा’

मुलायम यांच्या घरी वीज विभागाचा ‘छापा’ 

इटावा / वृत्तसंस्था :

उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या कारवाईची धग आता वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचू लागली आहे. गुरुवारी समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायम सिंग यादव यांच्या इटावा येथील निवासस्थानावर वीज विभागाच्या अधिकाऱयांनी ‘छापा’ टाकला.

इटावातील मुलायम सिंग यांच्या  निवासस्थानी वीज विभागाचे कर्मचारी अचानक दाखल झाले. या अधिकाऱयांनी केलेल्या तपासणीत मुलायम यांच्या निवासस्थानात फक्त 5 किलोवॅट क्षमतेचा मीटर लावलेला असल्याचे तर घरात यापेक्षा 8 पट अधिक वीजेचा वापर होत असल्याचे आढळले. याशिवाय मुलायम यांच्या निवास्थानावर 4 लाख रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. त्यांना या महिन्याच्या अखेरपर्यंत थकबाकी भरण्याची मुदत देण्यात आली आहे.

वीज विभाग वीजेची चोरी रोखण्याचा प्रयत्न करत असून ओव्हरलोडिंगची तपासणी तसेच थकबाकी वसूल केली जात आहे. आता मुलायम यांच्या घरी 40 किलोवॅटचा मीटर लावण्यात आल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले.

उत्तरप्रदेशात वीजचोरी प्रकरणी इटावा पहिल्या स्थानी आहे. भाजपचे सरकार येताच वीज अधिकारी सातत्याने वीजचोरी रोखण्यासाठी मोहीम राबवत आहेत.

 

 

 

Related posts: