|Saturday, July 29, 2017
You are here: Home » Top News » मिरज – पंढरपूर मार्गावरील अपघातात सहा जणांचा मृत्यूमिरज – पंढरपूर मार्गावरील अपघातात सहा जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / सांगली  :

पंढपूरमध्ये देवदर्शन करून परतणाऱया भाविकांवर काळाने घाला घातला. सांगलीत मिरज-पंढरपूर मार्गावर मिनी बस आणि ट्रकच्या अपघातात मिनी बसमधील सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात 10 प्रवासी जखमी झाले आहेत.

कोल्हापूरच्या माले गावातील भाविकांवर विठ्ठ- रखुमाईच्या दर्शनासाठी पंढपूरला गेले होते. देवदर्शनकरून परत येत असताना शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास मिरज – पंढरपूर मार्गावर भाविकांच्या मिनी बसने रस्त्यालगत थांबलेल्या वाळूच्या ट्रकला मागून धडक दिली, या भीषण अपघातात सहा भाविकांचा घटनास्थळचि मृत्य़ू झाल. मृतांमध्ये एक महिला, दोन लहान मुले आणि तीन पुरूषांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या 10 प्रवाशांवर मिरजमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताच्या वृत्तानंतर कोल्हापूरच्या माले गावात शोककळा पसरली आहे. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिन अंदाज आहे. अपघातात नंदकुमार हेडगे, रेणुका हेगडे. आदित्य हेगडे, लखन राजू संकाजी, विनायक लोंढे आणि गौरव नरदे यांचा मृत्यू झाला आहे.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!