|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » निव्वळ वेतनाच्या 25 टक्के रक्कम पोटगी म्हणून दिली पाहिजे : सर्वोच्च न्यायालय

निव्वळ वेतनाच्या 25 टक्के रक्कम पोटगी म्हणून दिली पाहिजे : सर्वोच्च न्यायालय 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पतीच्या निव्वळ वेतनाच्या 25 टक्के रक्कम पत्नीला पोटगी म्हणून दिली पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. तसेच कायमस्वरुपी पोटगी देताना दोन्ही पक्षकारांच्या आर्थिक स्थितीवर निर्णय अवलंबून असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

पश्चिम बंगालमधील हुगळी येथील एका दाम्पत्याने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला. 2003 मध्ये स्थानिक न्यायालयात हे प्रकरण दाखल झाले होते. कनिष्ठ न्यायालयाने पतीने पत्नीला पोटगी म्हणून 4 हजार 500 रुपये देण्याचे आदेश दिले होते. पण ही रक्कम कमी असल्याने महिलेने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याप्रकरणात पतीला काही अंशी दिलासा देत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. पतीच्या निव्वळ वेतनाच्या 25 टक्के रक्कम ही पत्नीसाठी पोटगी म्हणून योग्य रक्कम ठरु शकेल, असे न्यायालयाने सांगितले.