|Wednesday, August 9, 2017
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सर्व मार्गांवर सेवा पुरवासर्व मार्गांवर सेवा पुरवा 

सर्व मार्गांवर परिवहन सेवा पुरवता येत नसेल तर सर्व मार्ग एसटी महामंडळाकडे सोपवा, असा आदेश उच्च न्यायालयाने वसई-विरार महापालिकेला दिला आहे. 1 एप्रिलपासून वसई तालुक्यातील शहरी प्रवासी वाहतूक बंद करण्याच्या एसटी महामंडळाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान गुरुवारी हा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

महापालिकेने परिवहन सेवा सुरू केल्यामुळे शहरी वाहतूक 1 एप्रिल पासून बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची विशेषत: विद्यार्थी आणि शेतकऱयांची लाईफलाईन असलेली एसटी बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी इयत्ता सातवीतील विद्यार्थी शरीन डाबरे आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉमणिका डाबरे यांनी उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेद्वारे केली होती. त्यावर गुरुवारी दुसऱयांदा सुनावणी झाली.

सुनावणी दरम्यान महापालिकेची वकील दामले यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. 21 मार्गांवर महापालिकेला परिवहन सेवा देता येणार नाही. एसटीने त्यासा”ाr आम्हाला जागा भाडय़ाने द्यावी, असा युक्तीवाद दामले यांनी केला. यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील लोखंडे, एसटीचे वकील देशमुख उपस्थित होते. पालिकेचे वकील दामले यांच्या युक्तीवादावर उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. महापालिकेला आपली जबाबदारी निभावता येत नाही, अशी नाराजी व्यक्त करून एकतर पालिकेने सर्व मार्गावर परिवहन सेवा पुरवावी अथवा महामंडळाला सर्व मार्ग द्यावे, असा आदेश मुख्य न्यायाधीश मंजूळा वेल्लूर यांच्या खंडपीठाने  दिला.

मागील सुनावणीच्यावेळीही न्यायालयाने महापालकेच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करून ताशेरे ओढले होते. नागरिकांच्या अशा प्रकारच्या मूलभूत गरजा पुरविणे कामी वसई-विरार महापालिकेची हेकेखोर आणि व्यापारी वफत्ती ही गंभीर बाब असून परिवहनासारखी मूलभूत गरज भागवणे पालिकेला शक्य होत नसेल तर ही सुविधा सुनिश्चित करण्यासा”ाr पालिका बरखास्त करून प्रशासक नेमण्याचे आदेश द्यावे लागतील, असे मत उच्च न्यायालयाने यावेळी आदेशात मांडले. तसेच सदर प्रकरणी राज्य सरकारने तत्काळ लक्ष घालून नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दखल घेण्याचे निर्देश देत पुढील सुनावणीपर्यंत एसटय़ा सुरूठेवण्याचे आदेशही यावेळी उच्च न्यायालयाचे मंजुळा वेलुर आणि कुलकर्णी यांनी त्यावेळी दिले होते.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!