|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘मनोहरी दा’ यांना सांगितीक मानवंदना

‘मनोहरी दा’ यांना सांगितीक मानवंदना 

कंठीय स्वरांप्रमाणेच निरनिराळय़ा वाद्यांतून निघणारे स्वरसंगीतही रसिकांच्या विशेष आवडीचे असते. वाद्यसंगीताची अशीच सुरेल मैफल गाजवणारे मनोहरी सिंह यांनी संगीत क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रसिद्ध सॅक्सोफोनिस्ट आणि राहुल देव बर्मन टीमचे एक प्रमुख सदस्य असलेल्या ‘मनोहरी दा’ यांची पाश्चिमात्य वाद्यांवरही चांगलीच हुकूमत होती. आपल्या वाद्यांच्या जादूई सुरांनी रसिकांना सुरेल आनंद देणाऱया या महान संगीत संयोजकाला मानवंदना देण्यासाठी इमोर्टल मनोहरी दा ही सांगितीक मैफल रंगणार आहे.

इमोर्टल मनोहरी दा या मैफिलीचे आयोजन आणि निर्मिती ऋजुता देशमुख, शिरीष जोशी, नितीन नाईक यांनी केली असून शुक्रवार 28 एप्रिलला सांयकाळी 8.30 वाजता यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा येथे ही मैफल रंगणार आहे. प्रत्येकाची सांगितीक आवड वेगवेगळी असली तरी विशेषत: हिंदी सिनेमातील संगीताची जादू सहसा ओसरत नाही. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱया एका पेक्षा एक सरस  गाण्यांचा नजराणा या मैफलमध्ये अनुभवता येणार आहे. या मैफिलीत आलोक काटदरे व शैलजा सुब्रम्हण्यम हे गायक तसेच नागेश कोळी (सॅक्सोफोन), मोहित शास्त्राr (फ्ल्यूट), चिराग पांचाळ, ओमकार देवस्कर (किबोर्ड), ब्रिजेश शहा (लीड गिटार), मनिष कुलकर्णी (बेस गिटार), सचिन सावंत (कोंगोढोलक), निशाद करलगिकर (तबला), दत्ता तावडे (ऑक्टोपॅड व ड्रम), दीपक बोरकर (तालवाद्य), समीत पेडणेकर (तुंबा) हे नामवंत वादक कलाकार सहभागी होणार आहेत आणि आनंद सहस्त्रबुद्धे सूत्रसंचालन व संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. या मैफिलीत महम्मद रफी यांची गाणी एक खास सेलिब्रेटी सादर करणार असून प्रेक्षकांसाठी ते सरप्राईज असणार आहे.

एखाद्या गाण्याला वाद्यसंगीताचा परीसस्पर्श कसा होतो हे मनोहरींनी आपल्या मनोहरी सुरांनी अनेक गाण्यांतून दाखवून दिले आहे. संगीत परंपरेतील एक सुरेल पर्व अशी ख्याती असलेल्या सॅक्सोफोनिस्ट मनोहरी दा यांना सूमधुर गीतांच्या माध्यमातून देण्यात येणारी मानवंदना संगीतप्रेमींसाठी स्मरणरंजनाची अनुभूती असणार आहे. या कार्यक्रमाची तिकीटे यशवंत नाटय़ मंदिर येथे सकाळी 9 ते 12 व सायंकाळी 5 ते 8 यावेळेत उपलब्ध होतील. तसेच ‘बुक माय शो’ या वेबसाईटवर सुद्धा ऑनलाईन बुकिंग करता येईल. अधिक माहितीसाठी शिरीष जोशी 9820092277 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts: