|Wednesday, August 2, 2017
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » रेती बंदर वरील कारवाईचे पालिकेच्या महासभेत पडसादरेती बंदर वरील कारवाईचे पालिकेच्या महासभेत पडसाद 

दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर कारवाई सुरू असतानाच या महापालिका प्रशासनाकडून ठिकाणच्या अवैध बांधकामांवर ही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी झालेल्या महासभेत या कारवाईचे पडसाद उमटले. नगरसेवक कासिफ ताणकी यांनी ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करत महासभेत पालिका प्रशासनाला जाब विचारला यावेळी प्रशासनाने ही कारवाई जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार झाली असल्याचे स्पष्टीकरण देत हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले.

कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी रेतीबंदरवर अवैधरित्या  सुरू असलेल्या रेती उपशावर जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी धडक कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार, महसूल विभागाबरोबरच पालिकेच्या अनधिकृत विभागाच्या मदतीने वाळूमाफियांवर कारवाई करण्यात आली. या दरम्यान, खाडी किनारी असलेल्या जेटी क्रेन देखील तोडण्यात आल्या. तर कोटय़वधींचा रेतीसाठा उद्धवस्त करण्यात आला. दरम्यान, या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून कल्याण खाडी किनारी साडेतीन किलोमीटर परिसरात वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. दरम्यान, मेरीटाईम बोर्डाकडून खाडीकिनारी असलेल्या 121 रहिवाशांना तर या परिसरातील 36 तबेलाधारकांना पालिका प्रशासनाकडून घरे आणि तबेले रिकाम्या करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. तर सदर घराचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

या कारवाई विरोधात काही जणांनी जप्त केलेला माल नष्ट का केला. त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, महासभेत नगरसेवक कासिफ तानकी यांनी या ठिकाणी लिलावात घेतल कोटींची सामुग्री तोडून टाकण्यात आल्याने कोटय़वधींचे नुकसान झाल्याचा आरोप केला. यावेळी यावेळी तानकी यांनी महापालिकेच्या अधिकाऱयांना या ठिकाणी कारवाईचा अधिकार काय असा सवाल विचारला. मात्र, प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार, कारवाई झाल्याचे स्पष्टीकरण देताच संतापलेल्या ताणकी यांनी जिल्हाधिकाऱयांनी खून करायला सांगितले तर कराल का असा सवाल विचारला. त्यामुळे काही काळ सभागफहातील वातावरण तापले होते.

पुढे बोलताना ताणकी यांनी बदरावर नुसतीच रेतीचा धंदा होत नाही तर मासेमारी, दुधाचा व्यवसाय देखील होते असे सांगितले. या परिसरात तब्बल 7 हजाराहून अधिक नागरिक तसेच 7 तबेले असून या तबेल्यात 2 हजारांच्या आसपास म्हशी आहेत. पालिका प्रशासनाच्या अधिकाऱयांनी 5 एप्रिलची नोटीस चक्क 7 एप्रिलला लावत लोकांचे पाणी, लाईट कनेक्शन खंडित करून जनतेला त्रास देत असल्याचा आरोप करत ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगितले.

तसेच या कारवाई दरम्यान खाडीकडे येणारे व जाणारे सर्व वाहनांचे मार्ग बंद करण्यात आल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे सभागफहाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आयुक्तांनी सदर रेतीबंदर वर कारवाई ही जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार करण्यात आली. कारवाई दरम्यान शासनाला स्थानिक स्वराज्य संस्थाकडून कारवाईसाठी आवश्यक ती सामुर्गीबाबत मदत करावी लागते. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानंतर पालिकेचे कर्मचारी ही तेथे दाखल झाले. दरम्यान सदर प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने या विषयी चर्चा करू शकत नाही, असे सांगितले. तसेच पुढे बोलताना कारवाईत अडचण नको म्हणून खाडीकडे येणाऱया आणि जाणाऱया वाहनांसाठी रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला. कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय नाही, असे स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक निलेश शिंदे यांनी नव्याने खुल्या करण्यात आलेल्या गोविंदवाडी बायपासवर एकूण 23 ठिकाणी स्पीडब्रेकर असून याबाबत निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी महापौरांनी पाहणी करत रस्ता बंदिस्त केल्यानंतर सदर स्पीडब्रेकर आवश्यक तेथे काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.

पडसाद का उमटले ?

– अवैधरित्या सुरू असलेल्या रेती उपशावर जिल्हाधिकाऱयांकडून कारवाई

– पालिकेच्या अनधिकृत विभागाच्या मदतीने वाळू माफियांवर कारवाई

– खाडी किनारी असलेल्या जेटी क्रेन तोडून कोटय़वधींचा रेतीसाठा उद्धवस्त

– 121 रहिवाशांना पालिका प्रशासनाकडून घरे रिकाम्या करण्याच्या नोटीसा

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!