|Sunday, June 16, 2019
You are here: Home » Top News » अमेरिकेनंतर आता सौदीमध्ये परदेशी नागरिकांना ‘नो व्हेकन्सी’

अमेरिकेनंतर आता सौदीमध्ये परदेशी नागरिकांना ‘नो व्हेकन्सी’ 

ऑनलाईन टीम / रियाध :

अमेरिका, ब्रिटेन आणि ऑस्ट्रेलिया या देशानंतर आता सौदी अरेबियाने परदेशी नागरिकांसाठी ‘नो व्हेकन्सी’चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या देशातील परदेशी नागरिकांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सौदी सरकार शॉपिंग मॉल्स आणि इतर ठिकाणी केवळ आपल्या नागरिकांना नोकरीवर ठेवणार आहे. याचबरोबर देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सौदी अरेबिया सरकार आता कच्च्या तेलाशिवाय इतर उद्योगांचा विकास करण्यावर भर देणार असून, याच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यावर विचार करत आहे. सौदी सरकारच्या या निर्णयामुळे भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशातील नागरिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.