|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटवर सीबीआयचे छापे

पुण्यात सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटवर सीबीआयचे छापे 

 ऑनलाईन टिम / पुणे  :
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सर्व कार्यालयांवर सीबीआयने शुक्रवारी छापे मारून महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. पुण्यातील सिंहगड रस्ता, हडपसर, पुणे मुंबई रस्ता आदी ठिकाणी असलेल्या कार्यालयात छापे टाकण्यात आले आहेत.
 सिंहगड इन्स्टिट्यूट आणि संस्थापक मारुती नवले यांच्याविरुद्ध सेंट्रल बॅंके कडून घेतलेले 75 कोटी रुपये बेकायदेशीर पणे अन्यत्र वर्ग करून फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने छापे मारून महत्वाची कागदपत्र ताब्यात घेतली. नवले यांच्या घराची झडती घेण्याचे कामही सध्या सुरू आहे. त्यांची बॅंक खाती आणि लोकर्सचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.