|Thursday, July 27, 2017
You are here: Home » विशेष वृत्त » हा शेफ करतो सलग 52 तास स्वयंपाकहा शेफ करतो सलग 52 तास स्वयंपाक 

ऑनलाईन टीम / नागपूर :

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या सलग 52 तास स्वयंपाक करण्याच्या विक्रमाला नागपुरात सुवात झाली आहे. जागतिक विक्रम रचण्यासाठी तीन दिवस ते सलग खाद्यपदार्थ बनवणार आहेत.

मैत्री परिवारातर्फे इन्स्टिय़ूट ऑफ इंजिनिअर्स येथे शुक्रवारी मॅरेथॉन स्वयंपाक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात विष्णू मनोहर हे सलग 52 तासात एक हजारापेक्षा जास्त शाकाहारी पदार्थ तयार करून विश्वविक्रम स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यापूर्वी 40 तास सलग स्वयंपाक करण्याचा जागतिक विक्रम नोंदवण्यात आला आहे. 12 मार्च 201 रोजी 40 तास

कुकिंगचा विक्रम अमेरिकेतील ग्रीन व्हिलेजचे बेंजामिन पेरी यांनी नोंदवला आहे. विष्णू मनोहर हा विक्रम मोडण्याचा प्रयत्न नागपुरात करतील. शुक्रवारी 21 एप्रिलला सकाळी 7.15 वाजता या उपक्रमाची सुरूवात झाली. 23 एप्रिलच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा खाद्यपदार्थचा उत्सव चालणार आहे. या मॅरेथॉन उपक्रमान जवळपास सर्व भारतीय खाद्यपदार्थ तयार केले जातील . केवळ 40 पदार्थ हे भारताबाहेरील असतील.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!