|Monday, March 25, 2019
You are here: Home » Top News » मुंबईतील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आग

मुंबईतील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आग 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई उच्च न्यायालयासमोरील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आग लागली. ही आग दुपारी लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आग लागलेल्या इमारतीमध्ये बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक मुख्यालय आहे. त्यामुळे बँकेची महत्त्वपूर्ण कागदपत्रे या इमारतीत आहेत. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या असून, ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. यासाठी क्रेनच्या मदतीने आगीपर्यंत पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे.

Related posts: