|Friday, July 19, 2019
You are here: Home » उद्योग » फ्लिपकार्टकडून रिटर्न पॉलिसी अधिक कठोर

फ्लिपकार्टकडून रिटर्न पॉलिसी अधिक कठोर 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

ई-व्यापार क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टने आपल्या रिटर्न पॉलिसीमध्ये कठोर बदल केला आहे. फ्लिपकार्टवर आता मोबाईल, वैयक्तिक सौंदर्य प्रसाधने, संगणक, कॅमेरा, कार्यालयीन उपकरणे, फर्निचर आणि स्मार्ट वियरेबल्स खरेदी केल्यानंतर रिफंड देण्यात येणार नाही. विक्रेत्यांच्या ऑपरेशन खर्चाची बचत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. फ्लिपकार्ट कंपनीने आपल्या वेबसाईटवर रिटर्न पॉलिसीची माहिती दिली आहे.

आपल्या सर्व ग्राहकांना कंपनीकडून कस्टमर प्रेन्डली रिफंड पॉलिसी देण्यात येत आहे. सध्याच्या 1,800 श्रेणीपैकी 1,150 उत्पादनांच्या प्रकारात सेल्फ सर्व्हिस पर्यायातून ग्राहक रिफंडची विनंती करू शकतात. सर्व श्रेणीतील दोन तृतीयांश उत्पादनांवर फ्लिपकार्टची रिफंड पॉलिसी लागू आहे. फ्लिपकार्टकडून प्रतिदिनी 25,000 रिफंड करण्यात येतात, यापैकी 60 टक्के प्रकरणात तत्काळ रिफंड देण्यात येतो, असे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले.

फ्लिपकार्टच्या या निर्णयाचे विक्रेत्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. फ्लिपकार्टच्या नवीन धोरणाने कंपनीचे नुकसान होईल असे सांगण्यात येते. कंपनीच्या रिफंड पॉलिसीवर विश्वास असल्याने ग्राहक ऑनलाईन खरेदी करतात. फ्लिपकार्टच्या नवीन पॉलिसीमध्ये चांगल्या आणि नुकसानकारक बाबी आहेत. या धोरणाने कंपनीच्या ऑपरेशन खर्चात कमी येईल, मात्र दीर्घ काळासाठी ग्राहक दूर जाण्याचा धोका आहे.

काय आहे पॉलिसी…

? घरपोच वस्तू देण्यात आल्यानंतर 10 दिवसांत ती सदोष आढळल्यास कोणत्याही शुल्काशिवाय समान मॉडेल देण्यात येईल.

? कंपनी अथवा विक्रेत्याजवळ वस्तू उपलब्ध नसल्यास किंवा विक्री बंद करण्यात आल्यास त्याच प्रकरणात वस्तू अथवा त्या भागाचा रिफंड विक्रेत्याकडून देण्यात येईल.

? स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर त्यामध्ये कोणतीही समस्या उद्भवल्यास पहिल्यांदा ट्रबलशूटच्या माध्यमातून सोडविण्यात येईल.

?          30 दिवस एक्स्चेंज विन्डो कपडे, चपला, चष्मा आणि फॅशन उत्पादनांसाठी असेल.