|Saturday, September 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शाळेला भेटवस्तू देऊन मुलाच्या स्मृती जागवल्या

शाळेला भेटवस्तू देऊन मुलाच्या स्मृती जागवल्या 

वार्ताहर/ मुरगूड

वयाच्या दुसऱया वर्षापासून ब्रेन टय़ूमर झाल्याने सैरभैर झालेल्या पालकांनी आपल्या पाल्याला वाचवण्यासाठी महत्प्रयास केले. पण मुलगा कांही हाती लागला नाही. आजारी अवस्थेतही मुलाची शिकण्याची प्रचंड इच्छा. पण नियतीने त्याची ही मनिषा पुरी होऊ दिली नाही. या आजारातच एक दिवस त्या लहानग्यानं या जगाचा निरोप घेतला. चिमगाव ता. कागल येथील हर्षद विश्वास लोंढे असे या दुर्देवी बालकाचे नाव. एक वर्षापूर्वी हर्षदच्या जाण्याने लोंढे कुटूंबावर मोठा आघात झाला होता. त्याच्या पालकांनी हर्षदच्या स्मृती कायम जपण्यासाठी त्याची ज्या शाळेत शिकण्याची इच्छा अपूरी राहीला,r त्याच शाळेला पालकांनी नुकतीच लोखंडी तिजोरी भेटवस्तू म्हणून सुपूर्द केली. दलितमित्र प्रा. दत्ता चौगले यांच्या हस्ते मुख्याध्यापक ए. एन्. पाटील यांच्याकडे पालक विश्वास वसंत लोंढे यांनी ही भेटवस्तू देऊ केली. दिवंगत मुलाच्या स्मृती कायमस्वरूपी चिरकाळ टीकून राहाव्यात या हेतूने लोंढे यांनी केलेला प्रयत्न नक्कीच प्रेरणादायी होय. यावेळी आनंदा गोधडे, आनंदा करडे, विद्या परीट, प्रतिक्षा चौगले, संदिप मुसळे, सुनिल कुलकर्णी, सुरेश कांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts: