|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाची मनपावर सत्ता

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाची मनपावर सत्ता 

प्रतिनिधी/ लातूर

लातूर शहरावर आजपर्यंत काँग्रेसची एकहाती सत्ता होती. आज झालेल्या निवडणुकीत भाजपाने तब्बल 36 जागांवर विजय मिळवून मनपात झिरो टू हिरो बनण्याचा मान प्राप्त केला. गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेपासून ते अनेक स्वराज्य संस्थेवर निर्विवाद सत्ता असलेल्या काँग्रेसला 33 जागांवर समाधान मानावे लागले, भाजपाला लातूर महापालिकेच्या निवडणुकीत 36 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले तर शिवसेना व महाराष्ट्र परिवर्तन आघाडीला खाते ही उघडता आले नाही. या निवडणुकीत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी एक हाती सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहे. तर काँग्रेसच्या पहिल्या महापौर प्रा. स्मिताताई खानापूरे यांचा पराभव झाला. तसेच माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनीही पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख ऍड. बळवंत जाधव यांची कन्या तेजस्वीनी जाधव हीचा पराभव झाला.

मागील 65 वर्षापासून लातूर नगरपालिकेवर काँग्रेसचीच सत्ता होती. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेली पालिका आता भाजपाच्या ताब्यात गेल्याने जिह्याच्या राजकारणात बद्दल झाल्याचे दिसून येते. भाजपाच्या अनेक नवख्या उमेदवारांनी विजय प्राप्त करून काँग्रेसच्या दिग्गज उमेदवारांचा पराभव केला. महापालिकेची निवडणूक संभाजी पाटील विरूद्ध अमित देशमुख अशीच पहावयास मिळाली. लातूर शहर महानगरपालिका 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल शुक्रवारी सकाळी 10 वा. मतमोजणीस प्रारंभ झाला. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने आरोप प्रत्यारोप केले होते. मोठय़ा प्रमाणावर उन्हाचा पारा असतानाही उमेदवारांनी मोठय़ा प्रमाणावर प्रचार केला. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख यांच्यात मोठय़ा प्रमाणावर आरोप प्रत्यारोप करण्यरात आले. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या उमेदवारांची संख्या मोठय़ा प्रमाणावर असतानाही जनतेनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केले. या निवडणुकीतून भाजपाची सर्वच लाट असल्याचे दिसून येते. अनेक प्रभागातून भाजपाचे उमेदवार फिरकले नसल्याचेही सांगण्यात येथे असले तरी प्रत्यक्षात लातूरकरांनी मात्र भाजपाच साथ दिली. पालकमंत्री संभाजी पाटील यांना सुरवातीपासूनच शहरजिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली शहरता सर्वत्र प्रचारयंत्रणा योग्य पद्धतीने राबवली. ज्या महापालिकेत भाजपाला एकही जागा नव्हती त्याच महापाकिलेत भाजपाचा महापौर होणार हे मात्र नक्की. काँग्रेसनेही या महापालिका निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर ताकद लावली होती. आ. अमित देशमुख हे शहरातील सर्वच प्रभागात सभा घेऊन महापालिका जिंकण्यासाठी अटोकाट प्रयत्न केला. परंतु काँग्रेसला केवळ 33 जागावर समाधान मानवे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपात चांगले बळ होते गेल्या वेळेपेक्षा या निवडणुकीत राष्ट्रवादीला जास्त जागा मिळतील असा दावा पक्षाकडून केला जात होता. परंतु केवळ एकच ती ही राज मनियार यांची जागा 35 मतांनी निसटता विजय मिळवला. महापालिकेत यापूर्वी शिवसेनेची मोठी संख्या होती. शिवसेनेला महापालिकेत साधे खाते ही उघडला आले नाही. लातूर जिह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी लातूर जिह्यातील शिवसेना जवळपास संपवल्याचाच आरोप सर्वत्र होताना दिसत आहे. ऍड. अण्णाराव पाटील यांनी परिवर्तन विकास आघाडी या नावाने एमआयएमच्या मदतीने निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते परंतु या निवडणुकीत परिवर्तन आघाडीला आपले खाते ही उघडता आले नाही.

लातूर अनेक काळापासून काँग्रेसची हवा मोठी होती. त्यामुळे सर्वच संस्था काँग्रेसच्या ताब्यात होत्या परंतु भाजपाच्या लाटेत काँग्रेसची गढी ढासाळत असल्याचे दिसून येते. खासदार भाजपाला, जिह्यातील आमदारही भाजपाचे तसेच जिल्हा परिषद, नगरपालिकामध्ये भाजपामध्ये सत्ता काबीज करून महापालिकेवरही विजय मिळवत 70 पैकी 36 जागावर बहुमत मिळवले. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला हा मोठा विजय असून दिवसेदिवस काँग्रेसची लातूरात पिछहाट होत आहे. मनपा निवडणुकीत दिग्गज राजकारणी म्हणून ओळखले जाणारे व अनेक पदे भोगलेले माजी महापौर स्मिताताई खानापूरे, अजगर पटेल, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे अशा दिग्गज नेत्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली विद्यमान महापौर ऍड. दिपक सुळ, विक्रांत गोजमगुंडे, पुजा पंचाक्षरी, पप्पू देशमुख, कमल सोमवंशी, गौरव काथवटे, फरजाना बागवान आदी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. भाजपाकडून ऍड. शैलेश गोजमगुंडे, देविदास काळे, शैलेश स्वामी, सुरेश पवार, शितल मालू, अजय कोकाटे, शंकुतला गाडेकर, डॉ. दिपा गिते, शशीकला गोमचाळे आदीचा विजय झाला आहे. माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा मुलगा अजितसिंह पाटील कव्हेकर हे भाजपामधून विजयी.

गोविंदपूरकर, राजा मनियार, विक्रांत गोजमगुंडे, पंचाक्षरी, पप्पू देशमुख विजयी

Related posts: