|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » सततच्या पराभवानंतर मनसेची चिंतन बैठक ; मात्र राज ठाकरे अनुपस्थित

सततच्या पराभवानंतर मनसेची चिंतन बैठक ; मात्र राज ठाकरे अनुपस्थित 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी मनसेकडून चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले. मात्र, या बैठकीत खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अनुपस्थित आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगलाच फटका बसला. त्यामुळे या पराभवाची कारणे शोधण्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राजगडवर मनसे पदाधिकाऱयांची चिंतन बैठक बोलावली आहे. या बैठकीत मनसेचे सरचिटणीस, नेते आणि उपाध्यक्ष यांची उपस्थिती असणार आहे. मात्र, राज ठाकरे यांची पुण्यात पूर्वनियोजित बैठक असल्याने ते या चिंतन बैठकीत उपस्थित असणार नाहीत.