|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी आज मतदान

फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी आज मतदान 

पॅरीस

 फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत फ्रान्स्वा ओलांदे यांचा उत्तराधिकारी निवडला जाईल. 7 मे रोजी पहिल्या टप्प्याच्या आघाडीच्या दोन उमेदवारांदरम्यान अंतिम निर्णय होईल. या निवडणुकीचा निकाल फ्रान्स आणि युरोपीय महासंघाला नवे रुप तर देईलच, त्याचबरोबर युरोपीय देशांच्या संबंधांवर मोठा प्रभाव टाकणार आहे. या संबंधांना ब्रिटनच्या ब्रेक्झिटची पार्श्वभूमी आहे. एलीसी पॅलेसच्या (राष्ट्राध्यक्ष भवन) शर्यतीत यावेळचा प्रचार तसेच जनतेचा कल पाहिल्यास मोठी अनिश्चिता दिसून येत आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक उमेदवार असले तरीही खरी लढत विरोधी विचारसरणी असणाऱया नेत्यांमध्येच आहे. इमन्यूएल मॅखूम हे मवाळ तसेच युरोप समर्थक आहेत. तर मरीन ली पेन या दक्षिणपंथी लोकप्रिय तसेच युरोपीय महासंघाच्या टीकाकार आहेत.

मुख्य लढत दक्षिणपंथी प्रंट नॅशनलच्या उमेदवार मरीन ली पेन आणि इमन्यूएल मॅखूम यांच्यात असेल असे आधी वाटत होते, परंतु आता ही लढत चौकोनी होईल अशी चिन्हे आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आता उदार-दक्षिणपंथी फ्रान्स्वा फियम आणि डाव्या विचारसरणीचे नेते जॉनलिक मेलेनशॉन देखील सामील झाले आहेत. तर मेलेनशॉन ज्याप्रकारे या निवडणुकीत समोर आले आहेत, त्यानुसार ते सर्वाधिक लक्ष वेधून घेणारे ठरलेत.

सत्ताविरोधी भावनेच्या सहाय्याने ते लोकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर सत्ताधारी सोशलिस्ट पार्टीच्या चुकांचा लाभ उचलत आहेत. त्यांनी कर दरात वाढ, सार्वजनिक खर्चांमध्ये वाढ, राष्ट्रीयकरण आणि सोव्हिएत संघासोबतचे करार संपुष्टात आणण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.

तसेही ली पेन आणि मॅखूम आता मतदारांच्या पसंतीचे ठरल्याचे चित्र आहे. ली पेन यांनी एकीकडे जागतिकीकरण विरोधी, स्थलांतरित विरोधी आणि आक्रमकपणे युरोपीय संघ विरोधी भूमिका अवलंबिली आहे. तर मॅखूम एक अशा फ्रान्सचे स्वप्न मांडत आहेत, जो पूर्णपणे खुला आणि विविधतांना सामावून घेणारा असेल. मॅखूम श्रमबाजारात सुधार आणि सार्वजनिक खर्चांचे व्यवस्थापन करण्याच्या मताचे आहेत.

Related posts: