|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गव्याच्या जखमी पिल्लावर आजरा वनविभागाकडून उपचार

गव्याच्या जखमी पिल्लावर आजरा वनविभागाकडून उपचार 

प्रतिनिधी/ आजरा

सोहोळेपैकी सोहाळेवाडी येथे पुलावरून उडी मारताना गव्याचे पाच महिने वयाचे पिल्लू जखमी झाले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. शनिवारी वनविभागाकडून या जखमी पिल्लावर उपचार करण्यात आले.

याबाबत मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री सोहाळेवाडीच्या शिवारात गवे शिरले होते. शेतकऱयांनी गव्यांना हुसकावून लावल्यानंतर गवे जंगलाच्या दिशेने जाताना ओढय़ावरील पुलावरून उडी मारताना या कळपातील हे पिल्लू जोराने आपटल्याने जखमी झाले. त्याच्या मानेला व डाव्या शिंगाला जबर मार लागला आहे. पूलाच्या खालील बाजूस गव्याचे पिलू जखमी अवस्थेत पडल्याचे आढळून आल्यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाला दिली.

जखमी गव्याची माहिती मिळताच वनपाल आर. एम. गवस, वनरक्षकर बी. आर. निकम, बी. बी. कुंभार, वनमजूर एस. एम. खोराटे, बी. बी. पाटील, एस. आर. पताडे, के. के. शिंदे, एम. एस. शिंदे यांनी सोहाळेवाडी येथे धाव घेतली. जखमी पिल्लाला ग्रामस्थांच्यामदतीने ओढय़ातून बाहेर काढून डंपरमधून सुलगांव रोपवाटीकेत आणले. याठिकाणी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ढेकळे व त्यांच्या सहकाऱयांनी गव्याची तपासणी करून औषधोपचार केले. उपचारानंतर या पिल्लाने चारा व पाणी पिले. मात्र मानेला व डाव्या शिंगाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उभे केले असता त्याचा तोल जात असल्याचे त्याला चालता येत नसल्याचे वनविभागातून सांगण्यात आले.

Related posts: