|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘गावभाग’ च्या पोलिसांवर कारवाईचे आश्वासन

‘गावभाग’ च्या पोलिसांवर कारवाईचे आश्वासन 

प्रतिनिधी / इचलकरंजी

     इचलकरंजी येथील गावभाग पोलिस ठाण्यातील दोन महिला मारहाण प्रकरणी पोलिस अधिकारी व कर्मचाऱयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस उपाधिक्षक विनायक नरळे यांनी उपोषणकर्त्यांना दिल्याने आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.

   येथील गावभाग पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे व पोलिस काँस्टेबल योगेश अवघडे यांनी पोलिस ठाण्यात दोन निरपराध महिलांना अमानुषपणे मारहाण व दलित महासंघाच्या सामाजिक कार्यकर्त्यांना  अपमानास्पद वागणुक देवून खोटय़ा गुन्हय़ात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप दलित महासंघाने केला होता.   संबधित पोलिस अधिकाऱयांची चौकशी होवून त्यांना  निलंबित करण्याच्या मागणीसाठी जानकी विशाल भंगी, पद्मावती व्यंकटेश बल्लारी व महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सुरेखा काटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सूरू केले होते.   

      यावेळी पोलिस उपअधिक्षक विनायक नरळे यांनी घटनास्थळी भेट देवून संघटनेच्या पदाधिकाऱयांशी चर्चा केली.  संबधित पोलिस अधिकाऱयांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.  त्यामुळे उपोषकर्त्यांनी तात्पुरते उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. प्रा. शहाजी कांबळे यांनी न्याय न मिळाल्यास पुन्हा लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी बबन सावंत, अमजदभाई पठाण, बाळासाहेब महापुरे, सागर लाखे, इस्माईल ऐनापुरे, रावसाहेब निर्मळे, दिपक कदम, गोविंदराव खटावकर, सलिम मुल्ला, जयश्नाr चौगुले, खंडेराज कुरणे, वसुंधरा भोरे, संगिता चव्हाण, संतोष बारटक्के, संतोष कांबळे व नागरिक उपस्थित होते.

Related posts: