|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ऍड. देशपांडेंच्या कार्यकर्त्यांची बसस्थानकात ‘दादागिरी’

ऍड. देशपांडेंच्या कार्यकर्त्यांची बसस्थानकात ‘दादागिरी’ 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा बसस्थानकात अतिक्रमीत असलेले सातारी पाहुणचारावर रात्रीची कारवाई झाली होती. त्यातील साहित्य नेण्यासाठी ट्रक्टर घेवून ऍड. वर्षा देशपांडे यांचे कार्यकर्ते दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आले. ही माहिती समजताच सातारा बसस्थानकाच्या आगारप्रमुख नीलम गिरी या ही आल्या. त्यांच्यावरच दादागिरी झाल्याने एसटी महामंडळाचे इतर अधिकारी भयभित झाल्याची चर्चा बघ्यांमध्ये सुरु होती. दरम्यान, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनीही येथे भेट देवून ऍड. देशपांडे यांच्याच कार्यकर्त्यांची पाठराखण केल्याचे बघ्यांमधून सांगण्यात आले.

सातारा बसस्थानकाचे डागडुजीचे काम सध्या सुरु आहे. काँक्रिटीकरण व बसस्थानकाचा इनगेट व आऊट बदलण्याबाबत हालचाली सुरु आहेत. तत्पूर्वी बसस्थानकात असलेले सातारी पाहुणचार या झुणकाभाकर केंद्राचे अतिक्रमण हटवण्याबाबत न्यायालयाने व महसूल प्रशासनाने दिल्याने ती कारवाई करण्यासाठी वारंवार प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र, ऍड. वर्षा देशपांडे यांच्या कार्यकर्त्यांकडून व त्यांच्या समर्थकांकडून जोरदार विरोध होवू लागला. कारवाई करता येत नव्हती. नुकतेच सुमारे दोन दिवसांपूर्वी रात्री हे अतिक्रमीत सातारी पाहुणचारचा पाहणुचार घेतला गेला. सकाळी भग्नावशेष उरले गेले. त्यावर ऍड. वर्षा देशपांडे यांच्या कार्यकर्त्यांनी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास बसस्थानकात ते ट्रक्टरसह खोरी व फावडे घेवून शिरकाव केला. टॅक्टर आतमध्ये आल्याचे समजताच त्यांना विरोध करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने आगारप्रमुख नीलम गिरी यांना आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, गिरी यांनाच दमबाजी करत दिवसा कारवाई का केली नाही? याबरोबरच जोरदार शाब्दिक चकमक उडाली. नीलम गिरी यांना दमबाजी होत असल्याने त्यांनी याबाबतची माहिती विभागीय नियंत्रक अमृता ताम्हणकर यांच्याशी संपर्क साधून याप्रकराची माहिती दिली. मात्र, या प्रकाराने बघ्यांनी गर्दी केली होती. त्यामध्येही ही चर्चा सुरु होती. कार्यकर्त्यांकडून ट्रक्टरमध्ये साहित्य गोळा करुन ते नेण्यात आले. त्याचे छायाचित्रेही ऍड. देशपांडे यांच्या कार्यकर्त्यांनी टीपली गेल्याची बघ्यांनी सांगितली. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी या केंद्राला भेट देवून त्याबाबत माहिती घेतल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांची भूमिका संशयास्पद

एकीकडे सातारा पोलीस चांगले काम करत असताना एसटीच्या अधिकाऱयांना दमबाजी होत असताना पोलिसांकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जाते. त्यामुळे अनेक नागरिकांनी पोलिसच अशा लोकांना सहकार्य करत असल्याची प्रतिक्रिया उमटली. दरम्यान, डीसी ऑफिसचा स्वतःचे नाव इन्स्पेक्टर पाटील असे सांगून पहारा करत होते. यामुळे नक्की गोलमाल काय याचीच चर्चा सुरु होती.

Related posts: