|Sunday, July 15, 2018
You are here: Home » Top News » एच- 1 बी व्हिसावरून भारतीय कंपन्यांवर नाराजी

एच- 1 बी व्हिसावरून भारतीय कंपन्यांवर नाराजी 

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

लॉटरी पद्धतीने एच -1बी व्हिसा देताना अतिरिक्त व्हिसा घेतल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला आहे. याबाबत टीसीएस,इन्फोसिस, कॉग्निझन्ट आदी कंपनींच्या कृतीवर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे.

व्हिसासाठी केलेल्या आर्जांमध्ये टीसीएस,इन्फोसिस, कॉग्निझन्ट कंपन्यांनी त्यांच्याकडील जागा भरण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर अर्ज मागवल्याचा आरोप व्हाइट हाऊसने केला आहे. यामुळे लॉटरी पद्धतीत या दोन्ही कंपन्यांसाठीच अधिक उमेदवार निवडले जाण्याची शक्यता वाढल्याचेही व्हाईट हाऊसने आपल्या आरोपात म्हटले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱयाच्या महणण्यानुसार टीसीएस, इन्फोसिस, कॉग्निझन्ट यांसारख्या कंपन्या त्यांच्या गरजेपेक्षा कितीतरी अधिक अर्ज एच -14बी व्हिसासाठी करून घेतात, जेणेकरून लॉटरी पद्धतीत त्यांचेच सर्वाधिक अर्ज मंजूर होतील. या तिन्ही कंपन्यांतून एच -1 बी व्हिसाधारकांना सरासरी वार्षिक वेतन 60 हजार ते 65 हजार डॉलर दिले जात आहे.

 

Related posts: