|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयास आय.एस.ओ. मनांकन

अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालयास आय.एस.ओ. मनांकन 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

वाळवा तालुक्यातील आष्टा येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालय व पदव्युत्तर संशोधन केंद्रास नुकतेच आय.एस.ओ. मनांकनाने सन्मानित करण्यात आले. ‘इंटरनॅशनल सर्टिफेकेशन ऑफ सर्व्हिसेस’ यांच्यावतीने मनीष पुराणिक, भिकाजी दाभोळे, सुनिल दातार व डॉ.तानाजी चौगुले यांच्या समितीने मुल्याकंन केले. ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन’ च्या नियमानुसार महाविद्यालय व हॉस्पिटलच्या कामकाजाची नोंद ठेवण्यात आली असून पदवी व पदव्युत्तर सर्व विभागांमध्ये आवश्यक उपकरणे, साधनसामुग्री, अद्ययावत सुविधा, गंथालय, क्रीडांगण तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे या सर्वांची यावेळी पाहणी करण्यात आली.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता, प्रशस्त इमारत व रुग्णांसाठी सर्व सोयींनीयुक्त रुग्णालय व महाविद्यालयाची प्रशासन व्यवस्था याबद्दल सामाधान व्यक्त करुन प्रशंसा करण्यात आली. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांची दूरदृष्टी, प्रेरणा, व अथक परिश्रमाने आयुर्वेद महाविद्यालयाने उत्तरोत्तर प्रगती केली. तसेच गुणवत्तेचा सतत ध्यास असलेले संस्थेचे सचिव ऍड.चिमण डांगे यांच्या गतिमान नेतृत्वाने संस्थेच्या नावलैकिकात दिवसेंदिवस अधिक भरपडत आहे. संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रा.आर.ए.कनाई यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने आयुर्वेद महाविद्यालयास आय.एस.ओ मानांकन प्राप्त झाले आहे. डॉ.विजय निकम यांनी संयोजन व डॉ.श्रध्दा संदीप शेळके यांनी उपसंयोजक म्हणून काम पाहिले. महाविद्यालयाचे प्राचार्य मार्गदर्शनाने महाविद्यालयातील सर्व अध्यापक, अध्यापकेत्तर कर्मचारी, हॉस्पिटलस्टाफ यांच्या उत्त्कृष्ठ सहकार्याने अण्णासाहेब डांगे आयुर्वेदक महाविद्यालयास आय.एस.ओ.मानांकन प्राप्त झाले. सचिन मिरजे, अनिल बसुगडे, आविनाश गायकवाड यांचे सहकार्य लाभले.

Related posts: