|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सवतीचा खून करणाऱया महिलेला जन्मठेप

सवतीचा खून करणाऱया महिलेला जन्मठेप 

प्रतिनिधी/ बेळगाव

कौटुंबिक वादातून सवतीचा खून करणाऱया महिलेला न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. पतीची साक्षच या शिक्षेला महत्त्वपूर्ण ठरली आहे. तिचा पतीनेच खून केल्याचा आरोप करत तिने आपला बचाव केला होता. मात्र साक्षीदार आणि पुराव्यावरुन खून करणाऱया महिलेलाच न्यायालयाने दोषी ठरविले असून तिला शिक्षा सुनावली आहे.

मंजुळा मल्लेशी न्हावी (वय 34, रा. केएसआरपी क्वॉर्टर्स मच्छे) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. तिने सवत लक्ष्मी (वय 25) हिचा 8 ऑक्टोबर 2014 रोजी झोपलेल्या अवस्थेतच ब्लेडने गळय़ावर वार करुन खून केला होता. पती मल्लेशी हा लक्ष्मी हिला अधिक जवळ करत होता. नोकरीच्या सर्व सवलती तिलाच देईल, अशी धास्ती घेऊन तिने हा खून केला होता.

मंजुळा हिचा विवाह मल्लेशी याच्याबरोबर झाल्यानंतर बरेच वर्षे या दोघांनाही मुल झाले नाही. यामुळे मंजुळा हिनेच पुढाकार घेऊन लक्ष्मी हिच्याशी मल्लेशीचा विवाह केला. हे सर्व जण केएसआरपी क्वॉर्टर्समध्ये राहत होते. मल्लेशी हा राज्य राखीव दलात सेवा बजावत आहे. तो केसकर्तनाचे काम करतो. 

 लक्ष्मी हिला दोन मुली झाल्या. त्यानंतर मंजुळा हिच्या मनामध्ये रोष निर्माण झाला. या दोघींमध्ये वाद सुरु होता. 8 ऑक्टोबर रोजी मल्लेशी कामावर गेला होता. लक्ष्मी झोपली होती. यावेळी मंजुळा हिने तिचा खून केला होता.

 मल्लेशी घरी आल्यानंतर त्याला ही घटना कळली. त्यानंतर त्याने  या घटनेची माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना दिली. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मरुळ सिध्दाप्पा यांनी पंचनामा करुन मंजुळा हिला अटक केली.

तत्कालीन उपनिरीक्षक जॉक्सन डिसोजा यांनी मंजुळावर फिर्याद दाखल केली. भा.दं.वि. 302 अन्वये गुन्हा नोंदविला व तिला अटक केली. या बाबत मुख्य  जिल्हासत्र न्यायालयात बेळगाव ग्रामीण पोलिसांनी दोषारोप दाखल केले होते. या प्रकरणी न्यायालयात 22 साक्षीदार, 30 कागदोपत्री पुरावे, 10 मुद्देमाल तपासण्यात आले. यामध्ये मंजुळा ही दोषी आढळल्याने न्यायाधीश आर. जे. सतीशसिंग यांनी तिला जन्मठेपची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी वकील म्हणून एस. आर. शिंदे यांनी काम पाहिले.

मल्लेशीची साक्षच ठरली महत्त्वपूर्ण

  मंजुळानेच खून केल्याची साक्ष मल्लेशीने न डगमगता न्यायालयात दिली होती. यामुळे ही साक्षच महत्त्वपूर्ण ठरली आहे.

कोवळय़ा मुली झाल्या पोरक्मया

आपल्या आईच्या आणि सावत्र आईच्या वादात लक्ष्मीच्या दोन्ही मुली पोरक्मया झाल्या आहेत. खून झाला त्यावेळी एक मुलगी तीन वर्षांची होती तर केवळ आठ महिन्यांची मुलगी होती.

तुम्ही सांगा हो मी खून केला नाही

मंजुळा हिला शिक्षा सुनावल्यानंतर मंजुळाने आपल्या वकिलांना मी खून केला नाही म्हणून तुम्ही न्यायाधीशांना सांगा हो, असे म्हणून ती वकिलांकडे विनवणी करत होती. पण एकदा शिक्षा झाल्यानंतर कमी होत नाही म्हणून तिचे वकील सांगत होते. हवे तर आपण उच्च न्यायालयात शिक्षेविरोधात दाद मागू असे म्हणून तिची समजूत काढत होते.

आठवडय़ात दोघा आरोपींना जन्मठेप

मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. जे. सतिशसिंग यांनी या आठवडय़ात दोघा जणांना जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. बुधवार दि. 19 एप्रिल रोजी सख्ख्या भावाचा खून करणाऱया हुक्मकेरी तालुक्मयातील कुरणी येथील श्रीशैल पराप्पा बागेवाडी याला जन्मठेपची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सोमवारी सवतीचा खून करणाऱया मंजुळा हिलाही न्यायाधीशांनी जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून एस. आर. शिंदे यांनी काम पाहिले.