|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » भागवतांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी मनापासून सुचवले : उद्धव ठाकरे

भागवतांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी मनापासून सुचवले : उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपतिपदासाठी मनापासून सुचवले आहे. देशात अनेक वर्षांनी पहिल्यांदा एकहाती सत्ता आली आहे. जर कणखर आणि खंबीर राष्ट्रपती असतील तर का नको, सवालही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

मुंबईतील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. राष्ट्रपतिपदाबाबत मला माहित नाही. कोणाच्या मनात काय येईल. एकमेकांची मने जाणून घ्यायला तेवढी जवळीक लागते. अनेक वर्षांनी पहिल्यांदा एकहाती सत्ता आली आहे. या पदासाठी जर कणखर आणि खंबीर राष्ट्रपती असतील तर का नको ? असा सवालही त्यांनी यावेळी केला. तसेच इतर ठिकाणी आरएसएस कार्यकर्त्यांची नेमणूक करतो, मग देशाचे नेतृत्त्व त्यांनी करायला हरकत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related posts: