|Thursday, October 18, 2018
You are here: Home » भविष्य » राशीभविष्य

राशीभविष्य 

अन्नपूर्णेचा अपमान म्हणजे सर्वात मोठा शाप

बुध. दि. 26 ते  2 मे 2017

माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान. एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढय़ात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच राहाते. अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घराण्याला उतरती कळा लागते. घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका. त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या. शत्रू जरी काही खातपीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काही ही बोलू नका. अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो दोघांनाही अन्नाचा शाप लागतो. गरिबीमुळे काहीजण भाकरी, ब्रेड, वडे, सामोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात. मांजरे व तत्सम पाणी काही वेळा चोरून दूर पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात. अथवा हुसकावून लावतात. चोरी करू नये हे बरोबर असलेतरी त्या मुक्मयाप्राण्यांना काय समजणार? एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते त्यासाठी असे प्रकार करू नका, मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये. घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व  वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात. यासाठ जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी  फिरवून चित्रावळी काढली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे. मंगलकार्याच्यावेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते. अन्नपूर्णा देवीप्रसन्न रहावी. संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो. अन्न शिजविणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले, वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रूसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्मयतो खाणे-पिणे करू नये. मनुष्यप्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात. हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. ‘अतिथी देवो भव’ ही म्हणही त्यासाठीचा वापरतात. कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरे, गायी व इतर मुक्मया प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते. ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो. अपघात होत नाहीत व झालाच तरी त्यातून सहीसलामत सुटका होते. अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तूही शांत रहाते. स्वतःची अद्यात्मिक शक्तीही वाढते. प्रत्येकाचे जीवन सुखी व समृद्ध करणारा जनकल्याणाचा एक विशिष्ट स्वयं मुहूर्त व त्याचे पूजन पुढील आठवडय़ात दिले जाईल त्याचा अनुभव पहा व इतरांनाही तसे करण्यास सांगा. इतरांच्या कल्याणतच आपलेही सुख सामावलेले आहे याचा अनुभव येईल.

मेष

रवि, हर्षल बलवान आहेत. सरकारी कामातील अडथळे दूर होतील. मान-सन्मान, प्रति÷ा वाढेल. संततीविषयक सर्व इच्छा पूर्ण होतील. अत्यंत अवघड व अशक्मय वाटणारे एखादे काम हातावेगळे होईल. धाडशी निर्णय घेऊन ते अमलात आणाल. नेपच्यून केतू युतीचा प्रभाव चालू आहे. सर्व बाबतीत सावध राहूनच कामे करावी लागतील. मित्रमंडळीपासून सावध रहा. महत्वाच्या गुप्त गोष्टींची वाच्यता कुठेह करू नका.


वृषभ

रवि, हर्षल, केतूचा प्रभाव वाढत आहे. साध्या सुध्या बाबी उग्र स्वरूप धारण करू शकतात. त्यासाठी  सर्व प्रकारचे वादविवाद, मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा. सरकारी अधिकाऱयांशी जपून बेला. तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका. शुक शत्रू असल्याने अनेक मार्गाने धनलाभाची शक्मयता. संततीच्या बाबतीत अविस्मरणीय घटना. विवाह व नोकरी व्यवसायात चांगले यश.


मिथुन

 रवि, हर्षल लाभात हा एकप्रकारचा अत्यंत शुभ व दैवी आशीर्वादाचा योग आहे. भाग्योदय भरभराटीच्यादृष्टीने चांगले योग. मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्याला उत्कर्षाची झालर लागेल. जीवनाला कलाटणी देणाऱया अत्यंत महत्वाच्या घटना घडण्याचे योग. अचनाक बदली नोकरीत स्थलांतर अथवा प्रवास योग. बुद्धीचा योग्य वापर केल्यास जीवनाचे सोने करू शकाल.


कर्क

दशमात रवि, हर्षल अत्यंत चमत्कारिक पण भाग्योदयकारक योग कुणाचे नशीब कसे फळेल सांगता येणार नाही. बेकाराना नोकरी मिळण्याचे योग. काहीजणांना अचानक बदली बढती अथवा स्थलांतराला सामोरे जावे लागेल. यापूर्वी कधीही पाहिला नसाल अथवा अनुभवला नसाल असे मोठे यश किंवा ऐश्चर्य लाभेल. सर्व क्षेत्रात लाभदायक वातावरण उत्कर्षाची कोणतीही संधी सोडू नका.


सिंह

राशीस्वामी रवि, हर्षलबरोबर असल्यान अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे अत्यंत अवघड कामातदेखील सहज यश मिळवाल. भाग्योदयाची दारे खाडकन उघडतील. अपघात, आजार, गैरसमज, शस्त्रक्रिया, शत्रुत्व यापासून रक्षण होईल. अपहरण, पैजा, स्कूबा ड्रायव्हिंग, खोल दऱयात प्रवास, जुगार व व्यसन तसेच मोबाईलचा गैरवापर व समुद्र स्थान अथवा समुद्राशी दंगामस्ती अंगलट येण्याची शक्मयता.


कन्या

शुक्राचे भ्रमण, विवाह, धनलाभ, भागिदारी, व्यवसाय, दूरवरच प्रवास व कोर्टप्रकरणे या बाबतीत अत्यंत शुभ फलदायी आहे. रवि हर्षल अष्टमात हा धोकादायक योग कोणत्याही बाबतीत बेफिकीर अथवा बेसावध राहू नका. कोणतेही धाडस अंगलट येऊ शकते. काही विचित्र प्रसंग घडून विवाहाचे योग. प्रेमप्रकरणात असाल तर विवाहाचे योग. पण फसगत व अघोरी प्रयोगांचीही शक्मयता.


तुळ

राशीचा अधिपती शुक्र आनंदी असल्याने सर्व कार्यात अपेक्षेपेक्षा अधिक यश देईल. अतिशय प्रबळ आहे. त्यामुळे मोठय़ाप्रमाणात धन लाभाच शक्मयता. तुमच्या वास्तूत काही दोष असतील तर काहीही खर्च अथवा मोडतोड न करता या महिन्यात ते दोष नष्ट करू शकता. हर्षल, रवि सप्तमात आहेत. कोर्टमॅटर, प्रवास, शत्रूपिडा व अपघातापासून जपावे लागेल. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका.


वृश्चिक

नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगले योग प्रमोशन इच्छित स्थळी बदली. स्वतःची वास्तू होण्याच्यादृष्टीने अनुकूल ग्रहमान. मनात जे आणाल ते साध्य करू शकाल. शुक्र, चंद्राचा योग. सर्व तऱहेने भाग्योदयकारक आहे. संकल्प योग्य व चांगला असेल तर मनातील अवघड इच्छा पूर्ण होऊ शकतील. रवि, हर्षलची युती जरा विचित्र आहे. शत्रुत्वाला प्रोत्साहन देऊ नका.


धनु

हर्षलच्या युतीत असलेला त्रिकोणाधिपती प्रसन्न आहे. त्यामुळे धनलाभ, प्रवास, शिक्षण, नोकरी व संततीच्यादृष्टीने चांगले अनुभव येतील. अतसपुत्ती दैवी साक्षात्कार दिव्य अनिभूती या बाबतीत शुभ योग. वास्तूसंदर्भात महत्वाच्या घटना घडण्याचे योग. चतुर्थातील शुक. स्वतःचे वाहन, घरदार, पैसा अडका याबाबतीत अनुकूल वातावरण निर्माण करील त्याचा फायदा करून घ्या.


मकर

 शुक्र अत्यंत शुभ आहे. एखाद्या कर्तृत्ववान माणसाला जर योग्यवेळी योग्य काम मिळाल्यास तो त्या संधीचे सोने करू शकता. पण नको ते काम दिल्यास त्याची काय अवस्था होईल, असा पडतो. सांप्रतचे ग्रहमान अत्यंत संदिग्ध आहे. अशावेळी मन शांत ठेवून मगच निर्णय घ्यावे लागतात. चतुर्थात रवि, हर्षल योग वास्तूच्या बाबतीत चमत्कारिक फळे देण्याची शक्मयता आहे. स्थलांतराचे योगही दिसतात.


कुंभ

रवि, हर्षल पराक्रमात हा योग सर्व कार्यात यश देणारा आहे. स्वतःचे कतृत्व दाखविण्याची संधी मिळेल. धनलाभाचे योग येतील. मोठय़ा प्रमाणात लाभ होण्याचे योग. वास्तू, जागा, वाहन यांची खरेदी होईल. व्यावसायिक क्षेत्रात तुमचा स्वतंत्र ठसा उमटेल. शुक्राचे धनस्थानातील भ्रमण सर्व बाबतीत मंगलमय वातावरण निर्माण करील.


मीन

धनस्थानी हर्षल, रवि असल्याने आर्थिक बाबतीत सावध रहावे लागेल. ध्यानीमनी नसताना अचानक नवे खर्च निर्माण होतील. आतापर्यंत अत्यंत अवघड वाटणारी काही कामे इतरांच्या मदतीने करून घ्यावी लागतील. मोठमोठय़ा कामात यश मिळवाल. तुमच्या राशीत असणारा शुक्र जीवनाला आयुष्याला सोनेरी वळण देण्याची शक्यता घरात कुणाचे तरी मंगल कार्य ठरेल.

 

Related posts: