|Thursday, June 27, 2019
You are here: Home » उद्योग » देशात यंदा गव्हाचे विक्रमी उत्पादन

देशात यंदा गव्हाचे विक्रमी उत्पादन 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जून महिन्यात संपत असलेल्या 2016-17 कृषी वर्षातगव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज कृषी मंत्रालयाकडून वर्तवण्यात आला आहे. याबाबत जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनूसार चालू वर्षात गहू उत्पादनाच्यादृष्टीने भारत 98 मेट्रीक टनाचा विक्रमी टप्पा गाठणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गतवर्षी हे उत्पादन  92.29 मेट्रीक टन इतके होते.

राज्य सरकार आणि या क्षेत्रातील तज्ञाकडून मिळवण्यात आलेल्या प्रतिक्रीयेवरून यावर्षी गव्हाचे 98 मेट्रीक टन एव्हढे विक्रमी उत्पादनाचा अनुमान असल्याचे कृषी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. फेबुवारी-मार्च महिन्यात पीक वाढीच्या दृष्टीने अनुकूल वातावरण राहिल्याने यावर्षी कृर्षीउत्पादनात भरघोस वृद्धी दिसून येणार आहे. तसेच तापमानातही यावेळी प्रतीकूल चढ-उतार झालेले नाही. याकारणाने पीक वाढीच्या दृष्टीने आवश्यक असणारी मृदेतील आद्रता टिकून राहण्यास सहाय़ झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले . या विक्रमी उत्पादनामूळे दर कोसळण्यासंबंधी भितीच्या पार्श्वभूमीवर 30 मेट्रिक टन गव्हाची आधाराभूत किंमतीत खरेदी करण्याचा सरकारचा मानस आहे. नव्या पीकाची कापणी सध्या जोरा-शोरात सुरू आहे. पंजाब आणि हरियाणासारख्या राज्यातून एफसीआईसहीत अन्य सरकारी संस्थांनी शेतकऱयांकडून आतापर्यंत 10 मेट्रीक टनाहुन अधिक गहू खरेदी केली आहे. तर दुसऱयाबाजुने उत्पादन वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱयांना चांगला दर मिळावा याकीरता सरकार धान्याच्या आयातीवरही निर्बंध लावत आहे. या अंतर्गतच धान्य आयातीवर 10 टक्के आयातशुल्क लावण्यात येणार असल्याचे कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱयांनी यावेळी सांगितले.