|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » इव्हान्स, एडमंड विजयी

इव्हान्स, एडमंड विजयी 

वृत्तसंस्था / बार्सिलोना

येथे सुरू असलेल्या बार्सिलोना खुल्या पुरूषांच्या एटीपी टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या डॅन इव्हान्स आणि कायली एडमंड यांनी एकेरीत विजयी सलामी दिली. मात्र रॉब्रेडोचे आव्हान पहिल्या फेरीत समाप्त झाले.

पहिल्या फेरीतील सामन्यात इव्हान्सने ब्राझीलच्या माँटेरोव्हचा 6-7, 6-2, 7-6, एडमंडने जेरेमी चार्डीचा 6-3, 6-4 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. इव्हान्सचा दुसऱया फेरीतील सामना जर्मनीच्या मिश्चा व्हेरेव्हशी होईल तर एडमंडची दुसऱया फेरीत गाठ ऑस्ट्रीयाच्या थिएमबरोबर पडेल. स्पेनच्या रॉब्रेडोला पहिल्याच फेरीत जपानच्या सुगीताने 6-4, 6-3 असे पराभूत केले. अलमॅग्रोने कॅनडाच्या डियाजवर 6-3, 6-4 अशी मात करून विजयी सलामी दिली.