|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगली वकील संघटनेची आज निवडणूक ,

सांगली वकील संघटनेची आज निवडणूक , 

प्रतिनिधी/ सांगली

 गेल्या काही दिवसांपासुन चुरशीने प्रचार सुरू असलेल्या सांगली वकील संघटनेच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे.ऍड.प्रमोद भोकरे आणि ऍड.शैलेंद्र हिंगमिरे यांच्यात अध्यक्षपदासाठी लढत होणार आहे. बुधवारी  दिवसभर मतदान होणार असून सायंकाळी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. संघटनेच्या सहा जागा बिनरारोध निवडूण आल्या आहेत. तर उर्वरित अकरा जागासाठी 19 जण रिंगणात आहेत.

सांगली वकील संघटनेच्या पदाधिकाऱयांची निवडणूक एक वर्षासाठी करण्यात येते. विद्यमान अध्यक्ष ऍड.हरिष प्रताप यांचा कार्यकाल संपल्याने नव्या पदाधिकाऱयांच्या निवडीसाठी निवडणूकीचा कार्यक्रम लागला आहे. एकूण सतरा जागापैकी सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर अकरा जागासाठी 19 जण रिंगणात आहेत. अध्यक्षपदासाठी ऍड.एस.टी.जाधव, प्रमोद भोकरे आणि शैलेंद्र हिंगमिरे यांचे उमेदवारी अर्ज होते. पण ऍड.एस.टी.जाधव यांनी माघारी घेतल्याने निवडणूक दुरंगी होत आहे. दोघांच्याही समर्थकांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली आहे. त्यामुळे आजच्या निवडणूकीकडे बार असोसिएशनसह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. उपाध्यक्षपदासाठी ऍड.राजेंद्र माने आणि ऍड.प्रशांत जाधव यांनी उमेदवारी दाखल केली आहे. सचिवपदासाठी प्रदीप जाधव, विजय मोहिते आणि अमोल पाटील, सहसचिवपदासाठी दिपक हजारे, मिलींद काळे, यांची तर महिला सहसचिव पदासाठी सीमा बनसवडे यांनी उमेदवारी दाखल केल्या आहेत.

 सदस्यांसाठी पुरूषांत करणसिंग ठाकूर, नितीन पाटील, समीर शेख, दत्ता वठारे, मनोज भोसले, विजय गाडेकर, संतोष मधाळे, सनी जमादार आणि जितेंद्र पाटील यांचे तर महिला सदस्यांसाठी जुलेखा मुतवल्ली, स्वाती सुर्यवंशी, सुमेत्रा रजपूत, अर्चना उबाळे आणि शोभा पाटील यांचे अर्ज आहेत.

 

Related posts: