|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » जे पित नाहीत त्यांना पेट्रोल दरवाढीचा भुर्दंड का ? : अजित पवारांचा सवाल

जे पित नाहीत त्यांना पेट्रोल दरवाढीचा भुर्दंड का ? : अजित पवारांचा सवाल 

ऑनलाईन टीम/ सांगली

जे लोक पित नाहीत त्यांनी पेट्रोल दरवाढीचा भुर्दंड का भरायचा, पिणाऱयाकडून घ्यायचा टॅक्स न पिणाऱयांकडून घेताना लाज वाटत नाही का, अशा शब्दात पेट्रोल दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी सुरू झालेली संघर्ष यात्रा आज सांगलीत दाखल झाली. यावेळी अजित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला. सुप्रीम कोर्टाच्या निणर्यामुळश महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील दारू दुकाने बंदी झाली आहेत. त्यामुळे त्यापासून मिळणारा महसूल बुडाला. दारूबंदी बुडालेल्या महसुलाची तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारने पेट्रोलवर 3 रूपये अधिभार लावला आहे. त्यामुळे पेट्रोल दरात महाराष्ट्र देशात सर्वात महागडे राज्य आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “दारू पिणाऱयांपासून मिळणारा महसूल बुडाला म्हणून त्याचा भार न पिणाऱयांनी का उचलायचा? पिणाऱयाकडून घ्यायचा टॅक्स न पिणाऱयांकडून घेताना लाज वाटत नाही का ’’